मुंबई BREAKING : पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना BMC ने केली तातडीची मदत

मुंबई BREAKING : पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना BMC ने केली तातडीची मदत

पावसाचा मोठा फटका बसलेल्या भागातील रहिवाश्यांसाठी मुंबई मनपाने तातडीने मदत दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट : मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rains) कोसळत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तसंच कामानिमित्त घराबाहेर पडलेले अनेक नागरिक बाहेरच अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाचा मोठा फटका बसलेल्या भागातील रहिवाश्यांसाठी मुंबई मनपाने तातडीने मदत दिली आहे.

सीएसटी ते कुर्ला दरम्यान मुंबई मनपाच्या शाळांमध्ये पावसाचा फटका बसलेल्यांची मुंबई मनपातर्फे तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. पुराचा जास्त फटका बसत असलेल्या रहिवाश्यांना मनपा शाळेत तातडीने नेलं जाण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पावसात अडकलेल्यांसाठी ही तात्पुरती व्यवस्था आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.

कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळवलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 5, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या