Elec-widget

मुंबईत पावसाचा जोर ओसरला, तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत

मुंबईत पावसाचा जोर ओसरला, तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत

मुंबईसह उपनगरांमध्ये आजही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून (2 सप्टेंबर) धुमशान घातलेल्या पावसाचा जोर मध्यरात्रीपासून ओसरला आहे. मुसळधार पावसामुळे कोलमडलेली तिन्ही मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पहाटेपासून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल धावू लागल्या असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे बुधवारी घराकडे पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सीएसएमटीहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पहाटे 3.17 वाजता अंबरनाथच्या दिशेनं पहिली लोकल रवाना करण्यात आली.

मुंबईसह उपनगरात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुसळधार पावसाचा फटका रस्तेसह रेल्वे वाहतुकीला बसला होता. सायन-कुर्ला-चुनाभट्टीदरम्यान ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य रेल्वे पूर्णतः ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा इशारा पाहता मुंबई, ठाणे आणि कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(वाचा : धार्मिक आणि शिक्षण संस्थांसाठी करसवलत होणार कमी, हे आहे कारण)

दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्ये आजही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(वाचा : युतीच्या जागांचा फॉर्म्युला काय? या नेत्याच्या घरी झाली पहिली बैठक)

(वाचा : घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरी, मुंबईकरांनो असं धाडस करू नका!)

वेधशाळेनं दिला Red alert

पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने weather updates कडे लक्ष ठेवावं, असंही म्हटलं आहे.

(वाचा : हे वाचा RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा)

सोमवारी (2 सप्टेंबर) रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अॅन्टॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. बुधवारी सकाळी मात्र पावसाने कहर केला.

सप्टेंबरचं रेकॉर्ड मोडलं

मुंबईत सप्टेंबरमध्ये पडणारा सरासरी पाऊस 341मिमी इतका असतो. या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच पावसाने हा विक्रम मोडला आहे. चार दिवसात तब्बल 403मिमी पाऊस झाला आहे.

पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 07:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...