• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • VIDEO: मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात; पाण्यात चारचाकी वाहनंही गेली वाहून

VIDEO: मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात; पाण्यात चारचाकी वाहनंही गेली वाहून

मुंबईतील बोरिवली पूर्व भागात रविवार पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे, परिसरात सगळीकडे पाणी साचलं (Rainwater Entered Mumbai's Borivali East Area) आहे.

 • Share this:
  मुंबई 18 जुलै : पावसाळा सुरू झाला की देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळतं. यंदाही यात कोणताही बदल झालेला नाही. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांना रेड (Red Alert) तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही (Orange Alert) देण्यात आला आहे. अशात आता रविवारी पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसानं (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर.., बीडमध्येच ठाकरे सरकारच्या मंत्र्याकडून ऑफर मुंबईतील बोरिवली पूर्व भागात रविवार पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे, परिसरात सगळीकडे पाणी साचलं (Rainwater Entered Mumbai's Borivali East Area) आहे. रस्त्यांवर साचलेल्या या पाण्यामध्ये काही चारचाकी गाड्याही वाहून गेल्या आहेत. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही चारचाकी गाड्या पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याचं पाहायला मिळतं. SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा दौरा पुणे मनसेला नवसंजीवनी देणार का? मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती - पुढील आठवड्यात किंवा या महिन्यातील उर्वरित दिवसांदरम्यान पावसाची स्थिती काय असेल हे अस्पष्ट असल्याचं हवामान विभागाने सांगितले. जुलैमध्ये पडणाऱ्या तीव्र पावसाच्या अनुषंगाने सध्या तरी अनुकूल स्थिती नाही. सध्याची वाऱ्यांची दिशा बघता, पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या विरोधी वाऱ्यांमुळे मुंबईपासून पाऊस लांबच राहिल, असे अक्षय देवरस यांनी सांगितले. आयएमडीने 18 ते 20 जुलै दरम्यान मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून त्यानुसार, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे 17 ते 22 जुलै दरम्यान मान्सून स्थिती कार्यरत राहिल असा अंदाज, अक्षय देवरस यांनी वर्तवला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: