मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Rain Update : धक्कादायक! अवघ्या काही दिवसांच्या पावसाने मुंबईत 33 जणांचे बळी

Mumbai Rain Update : धक्कादायक! अवघ्या काही दिवसांच्या पावसाने मुंबईत 33 जणांचे बळी

मुंबईत (Mumbai) मागच्या 15 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने दैना उडाली आहे. (Mumbai rain update) दरम्यान झालेल्या पावसाने यंदा मुंबईत दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत (Mumbai) मागच्या 15 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने दैना उडाली आहे. (Mumbai rain update) दरम्यान झालेल्या पावसाने यंदा मुंबईत दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत (Mumbai) मागच्या 15 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने दैना उडाली आहे. (Mumbai rain update) दरम्यान झालेल्या पावसाने यंदा मुंबईत दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 12 जुलै : मुंबईत (Mumbai) मागच्या 15 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने दैना उडाली आहे. (Mumbai rain update) दरम्यान झालेल्या पावसाने यंदा मुंबईत दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. (Mumbai rain crisis) यंदा उशिरा दाखल झालेल्या पावसाने एक महिन्याच्या आतच मुंबईत 33 जणांचे बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai rain 33 death) 14 जून नंतर मुंबईत मान्सून (Mumbai monsoon rain update) दाखल झाला. परंतु मान्सून मुंबई जुलै महिन्यात पूर्णपणे सक्रीय झाला. दरम्यान झालेल्या पावसाने दरड, इमारत, घरे, झाडे यांची पडझड, शॉर्टसर्किट, समुद्रात बुडणे आदी घटना घडून जवळपास 33 जणांना जीव गमवावा लागला तर 60 च्यावर जखमी झाले आहेत. (Mumbai land slide)

याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांनी याची खबरदारी घेतली असती तर ही जीवित हानी टाळता आली असती. महापालिकेने धोकादायक इमारत घोषित करूनही अनेक रहिवाशी इमारतीतून बाहेर पडण्यास तयार नसतात. यामध्ये इमारत कोसळून अनेक जणांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत धोकादायक इमारती घरे कोसळणे, इमारतींचा व घरांचा भाग कोसळण्याच्या सर्वाधिक 114 घटना घडल्या. यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला. अन्य दुर्घटनांत दहा जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, सप्तशृंगी गडावर ढगफुटी अनेक भाविक जखमी

राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात

राज्यभरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आला आहे. आता पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने याबाबतची माहिती दिली आहे.

याशिवाय मुंबईमध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कायम राहील. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या भागात संपूर्ण काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच शक्य असल्यास अशा भागांमधून प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हे ही वाचा : कांजूरमार्गमध्ये मेट्रो प्रकल्प व्यवहार्य नाही, सोमय्यांचा RTI मधून दावा

नाशिकमध्ये ढगफुटी

नाशिक जिल्ह्यातील साडे तीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावातील संपर्क तुटला आहे. याचबरोबर सप्तश्रृंगी गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यामध्ये सहा ते सात भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published:

Tags: Monsoon, Mumbai, Mumbai rain, Rain fall, Weather update

पुढील बातम्या