LIVE NOW

LIVE : मुंबईवर चक्रीवादळाचं संकट नाही, पावसाचा जोरही ओसरला

मुंबई रेल्वेचे ताजे अपडेट

Lokmat.news18.com | July 10, 2018, 2:41 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 10, 2018
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 10 जुलै : कालपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे. विरार - नालासोपाऱ्याच्या  रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या 2 तासांपासून नालासोपारा स्टेशनवर एकही ट्रेन नाही. त्यामुळे सकाळी कामासाठी निघालेल्या मुंबईकरांना आजही मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबई रेल्वेचे ताजे अपडेट -  विरार - नालासोपारा वाहतूक पूर्णपणे विस्कळीत - विरारहून सुटणाऱ्या ट्रेन एक तास उशीरानं - विरार - बोरिवली वहातूकीवर परिणाम - सध्या केवळ वसई ते चर्चगेट रेल्वे सेवा सुरु - वसईच्या पुढे वहातूक अत्यंत धीम्या गतीने सुरु - मुंबईत पावसाचा जोर कायम - मुंबईत सखल भागात रात्री साचलं पाणी जागोजागी वाहतूक खोळंबली. - पश्चिम रेल्वेच्या वहातूकीवर परिणाम नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा  
corona virus btn
corona virus btn
Loading