मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई तुंबली, पालिका आयुक्तांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई तुंबली, पालिका आयुक्तांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Mumbai rain updates: मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh chahal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai rain updates: मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh chahal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai rain updates: मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh chahal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 जून: आज मुंबई (Mumbai Rain) ला पावसानं झोडपून काढलं आहे. पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली. या मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 12 तासात 140 ते 160 मिली पाऊस झाला. 24 तासात 500मिली पाऊस झाला की अतिवृष्टी म्हणतात, पण एका तासातच 100 हून अधिक पाऊस झाल्याचं आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी म्हटलं आहे.

दहिसर सब वे, चुनभट्ट पाणी साचलं असून हिंदमातामध्ये यावेळी 4 फीट उंचीचे रोड तयार केले. यामुळे प्रथमच हिंदमाताची वाहतूक थांबली नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं. 140 कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरू आहे. तिथे पाणी साचू देणार नाही. दीड किमीपर्यंत हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास 30 दिवस लागणार आहे. त्यामुळे त्यानंतर येथे कधीच पाणी साचणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ऑक्टोबरमध्ये प्रकल्प सुरू केला जानेवारीमध्ये ऑर्डर दिले. आता प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा- पहिल्या पावसाचा फटका; लोकल रद्द तर बस सेवेवरही परिणाम

पालिकेतर्फे गांधी मार्केटला मोठी पाईपलाईन टाकत आहोत. 30 जूनपर्यंत हिंदमाता प्रकल्प जवळपास पूर्ण होईल, असंही आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे. एक तासाच्या आत 30 मिली पेक्षा अधिक पाऊस एका तासात पडला की पाणी साचायला लागते. रेल्वे बरोबरील समन्वयाबाबत काही बोलायचं नाही. पालिकेने रेल्वे भागातही नालेसफाई केली असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं.

किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

मुंबईत पाणी (Mumbai Rains) भरणारच नाही, असा दावा कोणीच केलेला नाही आणि आम्ही असा करणार सुद्धा नाही. पूर्वी 2 ते 5 दिवस मुंबई ठप्प व्हायची. पण आता तसं होत नाही. आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहोत, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्पष्ट केलं. मुंबईत जोरदार पावसामुळे हजेरी लावल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उपाययोजनांबद्दल माहिती दिली.

4 तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाई काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल. आज एकाच वेळी हायटाईड, सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबले आहे. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर आम्ही आढावा घेतली आहे. १९५ मिली, १३७ मिली पाऊस झाला आहे. ९५ मिली पाऊस झाल्यास अंडरवॉटर पाणी डायव्हर्ट होतो. पण आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. कुठे निष्काळजीपणा होत असेल तर कारवाई करू, असं पेडणेकर यांनी सांगितलं.

First published:

Tags: Mumbai muncipal corporation, Rain