Home /News /mumbai /

मुंबईत पावसानं पुन्हा धरला जोर, नौदल आणि NDRFला सतर्क राहण्याच्या सूचना

मुंबईत पावसानं पुन्हा धरला जोर, नौदल आणि NDRFला सतर्क राहण्याच्या सूचना

हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबईत रेड अलर्ट जाहीर केला आहे.

    मुंबई, 04 जुलै : मुंबईत सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. कुलाबा, दक्षिण मुंबई , दादर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी तुरळक पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. पण दीड वाजेच्या सुमारास पावसाने पुन्हा जोर धरला आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबईत रेड अलर्ट जाहीर केला आहे. एवढेच नाही तर मुंबई आणि उपनगरात नौदल आणि एनडीआरएफला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं. अनेक रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आले होते. पण आज मात्र तसा पावसाचा जोर कमी आहे. पण तरीही झालेल्या पावसामुळे मुंबईची आजही दैना पाहायला मिळाली. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोकणात शुक्रवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असताना आता महाराष्ट्राच्या 6 जिल्ह्यांमध्ये वेधशाळेने RED ALERT जारी केला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक या 6 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने (IMD)अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. तिथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जिम ट्रेनरची हत्या, नऊ जणांनी कोयत्याने केले सपासप वार येत्या 48 तासात कोकण गोव्यासह पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. पुणे आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पहिल्याच जोरदार पावसात मुंबई तुंबली. दक्षिण आणि पश्चिम उपनगरांमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. त्यात भरतीची वेळ असल्याने मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागला नाही. हवामान खात्याने शुक्रवारीसुद्धा मुंबईसाठी Orange alert दिला होता. आता शनिवारसाठी मात्र याहून अधिक पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घरातच थांबावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक गमावला, 'दत्ताकाका' यांचं कोरोनामुळे निधन मुंबई शहर, मध्यवर्ती भागात शुक्रवारी 70 मिमी पाऊस पडला. मुंबईला व किनारपट्टीवर 24 ते 48 तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Monsoon, Monsoon 2020, Mumbai monsoon

    पुढील बातम्या