मुंबई, 10 जून : सोमवारी संध्याकाळी मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत अनेक शहरांमध्ये पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिलीमध्ये नागरिकांनी पहिल्या पावसाचा आनंद घेतला. तर पहिल्याच पावसात मध्य रेल्वेच्या अप-डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. कोपर रेल्वेस्थानकात पेंटाग्राफच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेले प्रवासी अडकले आहेत.
ठाण्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवेत गारवा अनुभवल्याने ठाणेकर सुखावले आहेत. पावसामुळे काही भागात वीज खंडित झाली आहे तर लहानग्यांसोबत मोठ्यांनीदेखील पावसाचा नाचून आनंद घेतला. राजगड-खोपोलीमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे.
भिवंडी शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून विजेच्या कडकडाटामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. अंबरनाथ-बदलापूरमध्ये शहरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. नवी मुंबईतही अनेक भागांत पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे.
हेही पाहा: SPECIAL REPORT : सिंहाच्या तोंडावर केक मारणारा ही व्यक्ती आहे तरी कोण?
अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी 11 जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
औरंगाबादमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली. औरंगाबादमध्ये आजही तुफान पावसाचं आगमन झालेलं पाहायला मिळालं. या पावसामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या मराठवाड्यातल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
इगतपुरीमध्येही (नाशिक)वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. घोटी भागातही पाऊस आला. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सगळे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही वादळी पावसाने मोठया प्रमाणावर नुकसान झालं आहे. पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि इतर इमारतीवरील पत्रे उडून गेले.
SPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत?