मुंबई, 6 जुलै : मुसळधार पावसामुळे होणारी मुंबईकरांची दैना यावर्षी देखील कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले असून मुंबईचा वेग मंदावला आहे.
कोणत्या भागात साचले पाणी?
मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये 2 फुट पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईतील वरळी चौकीच्या परिसरातही पाणी साचलं आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक मंदावली आह. माणखुर्दे रेल्वे स्टेशनच्या दक्षिकडील भादात पाणी साचले आहे. माणखुर्द चौकातही हीच परिस्थिती आहे. त्याचा परिणाम या भागातील वाहतुकीवर झाला आहे. दादर, भोईवाडा, किंग सर्कल या परिसरातील सखल भागामध्येही पाणी साचले आहे.
समुद्राला मोठी भरती
मुंबईत आज दिवसभर पाऊस सुरूच राहिल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज दुपारी 4 वाजून 49 मिनिटांनी 3.27 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असंही हवामान विभागानं बजावलंय.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. #MumbaiRain #Mumbai #Rainupdate pic.twitter.com/R7PCumttWd
— News18Lokmat (@News18lokmat) July 6, 2022
कोल्हापूरात NDRF सज्ज
मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत दहा फुटांनी वाढ झाली. सोमवारी सकाळी पंचगंगेची पातळी 15 फुटांवर होती. मंगळवारी सकाळी ती 24.5 फुटांपर्यंत गेली. दरम्यान आज (दि.06) नंतर सकाळी 9 पर्यंत 31 फुटांवर पोहोचली आहे. दर दोन तासाला सरासरी अर्धा फुटाने पाणी वाढत चालले आहे. काल रात्री नऊ वाजता पाणी पातळी 27.9 फुटांपर्यंत होती सकाळी तीच पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली आहे.
Raigad Rain: पेण, पनवेल, उरण तालुक्यात रात्रभर मुसळधार; भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती
पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट असून, धोका पातळी 43 फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढच्या 24 तासांत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची भीती आहे. जिल्ह्यातील कोणतीही धोकादायक परिस्थिती हातळण्यासाठी NDRF च्या तुकड्या सज्ज आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Rain, Rain updates