मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत पावसामुळे 'लॉकडाउन', लोकल सेवा ठप्प; घरी आहात घरीच राहा!

मुंबईत पावसामुळे 'लॉकडाउन', लोकल सेवा ठप्प; घरी आहात घरीच राहा!

राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

रात्रभरापासून सुरू असलेल्या पावसमुळे मुंबईसह अनेक उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

मुंबई, 04 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या मुंबईकरांवर आज अस्मानी संकट कोसळले आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा लॉकडाउन झाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अत्यंत गरजेचं असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन मुंबई पालिकेनं केले आहे.

सोमवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभरापासून सुरू असलेल्या पावसमुळे मुंबईसह अनेक उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.आजही मुंबई, ठाणे, पालघर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे स्थानकावर सायन इथं ट्रॅकवर पाणी साचले आहे.  तसंच परेल आणि सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर ठाणे ते कल्याण, कर्जत कसारा वाहतूक सुरू आहे.हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प झाली आहे.  परंतु, वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे.

मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दादर, सायन पुलाखाली गुडघाभर पाणी साचले आहे.

तर नवी मुंबईतही रात्रभर पासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री पासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे, अनेक नाले दुथडीभरून वाहत आहेत , पावसाचा अंदाज आल्याने सायन पनवेल महामार्गावर वाहतूक मंदावली.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai rain