मुंबई, 5 ऑगस्ट : मुंबईत पुन्हा एकदा तुफानी पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने मुंबईची दुरवस्था केली आहे. दक्षिण मुंबईत पावसाच्या झंझावाताने सर्वाधिक कहर केला. अनेक ठिकामी झाडं पडल्याने रस्ते बंद आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या पावसाळ्यात पहिल्यांदाच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दादर, हिंदमाता भागात तळं साठलं आहे. CSMT ते कुर्ला रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने वाशीकडे आणि कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूकही बंद आहे.
मुंबईतच्या तुफानी पावसाचे VIDEO पाहून परिस्थितीचा अंदाज येईल. पुढच्या 72 तासांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे.
दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली. मुंबई हायकोर्टाबाहेरही झाडं पडली. चर्चगेट परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं. याशिवाय दादर टीटी परिसरात नेहमीप्रमाणे पाणी साठलं आहे. हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे.
मुंबईत तुफानी पावसाला सुरुवात झाली आहे. चर्चगेट परिसराला तळ्याचं स्वरूप आलं आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेचा काही भाग वाहतुकीसाठी बंद, मध्य रेल्वेही ठप्प#MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/oVqTgYNpug
— News18Lokmat (@News18lokmat) August 5, 2020
मंगळवारी अतिवृष्टी अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई काळ्या ढगांनी अंधारली आहे. दक्षिण मुंबईत दुपारी तुफानी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.अक्षरशः वाहनांनाही हलवेल असा वारा अनुभवायला मिळतो आहे. पुढचे काही तास धोक्याचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी आणि सीएसएमटी ते कुर्ला वाहतूक ठप्प झाली आहे.