'तुंबई'ने असा घेतला दोघांचा जीव; तुंबलेल्या पाण्यात गाडी घालण्याआधी हा व्हिडिओ पाहा

'तुंबई'ने असा घेतला दोघांचा जीव; तुंबलेल्या पाण्यात गाडी घालण्याआधी हा व्हिडिओ पाहा

मालाडच्या सब वेमध्ये साठलेल्या पाण्यात एक स्कॉर्पिओ घुसली आणि बघता बघता पाणी वाढलं. दारं ऑटोलॉक झाली. गाडीतल्या दोघांना तिथेच जलसमाधी मिळाली. मुंबईत तुंबलेल्या पाण्यातला सर्वांत भीषण मृत्यू.

  • Share this:

मुंबई, 2 जुलै : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नेमकी किती हानी झाली, हे हळूहळू उलगडत आहे. मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघातात सर्वाधिक 21 नागरिकांचा मृत्यू झाला. 75 नागरिक जखमी झाले. मुलुंडमध्ये सोसायटीची भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तुंबलेल्या मुंबईचे सर्वांत भयंकर परिणाम दिसले मालाडमध्येच. मालाड सब वेमध्ये साठलेल्या पाण्याच्या लोंढ्यात एक गाडी अडकली आणि गाडीतल्या दोघांचा तिथेच गुदमरून मृत्यू झाला. तुफान पावसात आणि रात्रीच्या अंधारात हे दोघे गाडीसह बुडाल्याचं कुणाच्या लक्षातही आलं नाही. मंगळवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी या गाडीतून मृतदेह बाहेर काढले. मालाडच्या सब वेमध्ये साठलेल्या पाण्याच्या लोंढ्याने आणि तुंबलेल्या पाण्यात अडकलेल्या दोघांना सर्वांत भयंकर मृत्यू आला. रात्री तुफान पाऊस सुरू असताना मालाडचा हा सब वे संपूर्ण पाण्याखाली गेला होता. या पाण्यातच ही स्कॉर्पिओ घुसली. पण पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे ती तिथेच अडकली. ती पुढेही नेता येईना आणि मागेही येईना.

मुंबईच्या पावसात अडकली अभिनेत्री, या हिरोने वाचवले प्राण

जवळपास 10 फुट पाणी त्या वेळी तिथे होतं, असं स्थानिक सांगतात. पाण्याच्या दबावामुळे गाडीचे दरवाजे ऑटोलॉक झाले. त्यामुळे आतल्या दोघांना बाहेर पडणंही मुश्कील झालं. त्यातच पाण्याच्या दाबानं खिडकीची काचही फुटली असावी. त्यामुळे गाडीत पाणी शिरलं आणि या दोघांचं वाचणं अशक्य झालं. इरफान खान आणि गुलशाद शेख अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावं आहेत. पहाटे चार नंतर हा प्रकार लक्षात आला.

27 जूनलासुद्धा मुंबई उपनगरांमध्ये असाच तुफान पाऊस झाला होता.

पावसामुळे मुंबईची दैना, अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी!

त्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली होती. त्या वेळी मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला होता.

तुम्हाला कदाचित थोडा उशीर होईल. पण स्वतःचा जीव पणाला लावून पाण्यात गाडी घालू नका. पाणी तुंबलेल्या ठिकाणी पंप लावून पाणी काढेपर्यंत साचलेल्या पाण्यात गाडी घालू नका, असा संदेश महापालिकेनं हा व्हिडिओ शेअर करताना दिला होता. दरम्यान सोमवारच्या पावसात झालेल्या नुकसानीची माहिती देताना महापालिकेनं आकडेवारी सादर केली आणि आता पाणी ओसरत असल्याचं सांगितलं.

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, बुडता बुडता वाचले 2 बाईकस्वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 07:09 PM IST

ताज्या बातम्या