...आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवर NDRF ने सोडल्या होड्या, पाहा VIDEO

...आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवर NDRF ने सोडल्या होड्या, पाहा VIDEO

दोन लोकल ट्रॅकवरच थांबल्याने त्यातले सर्व प्रवासी तिथेच अडकले. ट्रॅकवर पाणी चढत गेलं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट : मुंबईत पावासाचा कहर सुरू आहे. दिवसभरात मुंबईच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 300 मिमीच्या वर पाऊस झाला आहे. या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. दोन लोकल ट्रॅकवरच थांबल्याने त्यातले सर्व प्रवासी तिथेच अडकले. ट्रॅकवर पाणी चढत गेलं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं.

बराच वेळ पाणी ओसरलं नाही आणि पावसाचा जोरही वाढत असल्याचं पाहून NDRF च्या टीमने चक्क रेल्वे ट्रॅकवर होड्या सोडल्या. आणि अडकलेल्या 290 प्रवाशांची सुखरूप सुटका केली.

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

रात्री दहा वाजता आलेल्या माहितीनुसार सर्वच्या सर्व 290 लोकांची सुटका करण्यात आली आहे.

मस्जिद बंदर स्टेशनच्या जवळ दोन लोकलमध्ये अंदाजे चारशे प्रवासी अडकले होते. त्यातल्या काहींना रेल्वे पोलिसांनी मदत केली आणि त्यांची सुटका केली. मात्र काही प्रवासी अजूनही लोकल ट्रेनमध्येच आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी NDRF ने बोटी सोडल्या आहेत.

जोरदार पावसाबरोबर तुफानी वाराही मुंबईत होता. मुंबईत आज किनारी भागात ताशी 100 किमी पेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. अनेक इमारतींवर असलेली होर्डिंग्ज वाकली. अनेक झाडं रस्त्यावर पडली.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी आवाहन केलं आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये मुंबई पेलिसांशी 100 या क्रमांकावर अथवा ट्विटरवर संपर्क साधवा, असही पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 5, 2020, 9:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading