Mumbai Rain ठाण्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू, लोकल विस्कळीत झाल्यामुळे चाकरमाने अडकले

Mumbai Rain ठाण्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू, लोकल विस्कळीत झाल्यामुळे चाकरमाने अडकले

Mumbai Rain Live मुंबई, ठाण्यात शनिवारी पावसाने कहर केला. दुपारनंतर मध्य आणि हार्बर सेवा विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. अजूनही रेल्वेसेवा सुरळीत झालेली नाही.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : मुंबई उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी पावसाने कहर केला. पश्चिम उपनगरं तसंच कल्याण, डोंबिवली, ठाण्यात धुवांधार पाऊस बरसला. घोंघावणाऱ्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अवघ्या तासाभरात रस्त्यांवरून नद्या वहायला लागल्या. याचा सगळ्यात मोठा फटका बसला रेल्वे वाहतुकीला. दुपारी २ नंतर मध्य आणि हार्बर सेवा ठप्प झाली. ती संध्याकाळपर्यंत  पूर्ववत झालेली नाही.  दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

पाहा PHOTO : मुंबईत उसळलेल्या सर्वात उंच लाटेची थरकाप उडवणारी दृश्यं

कल्याणला जाणारी पहिली लोकल ३ तासांनंतर लावण्यात आली. त्यामुळे ठाणे, कुर्ला स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्रवासी रेल्वे रुळांवरुन ट्रॅक क्राॅस करून धावत होते. मुंबईत मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे समुद्राच्या लाटा उंच उंच उसळल्या. सायन आणि कुर्ल्यादरम्यान पाणी साठल्यामुळे त्यामुळे दक्षता म्हणून रेल्वेसेवा बंद करण्यात आली. ती संध्याकाळी उशीरापर्यंत बंद होती.

धोका अजून कायम

मुंबई, ठाणे, पालघर आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. रविवारच्या दिवशीही हाय अलर्ट देण्यात आल्या आहे.

सावधान! 7 ऑगस्टपर्यंत या भागांत होणार मुसळधार पाऊस

नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

4 महिला वाहून गेल्या

दोन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळं पांडवकडा धबधब्याची पातळी वाढली. यात चक्क 4 महिला वाहून गेल्या आहेत. त्यामुळं पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

#MumbaiRains VIDEO: पावसाचं रौद्र रुप; ठाण्यात रस्ते, रेल्वे पाण्याखाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या