Mumbai Rain LIVE : पावसात अडकलेल्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी

Mumbai Rain LIVE : पावसात अडकलेल्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी

मध्य आणि पश्चिम रेल्वे बंद असल्याने सकाळपासून ऑफिसमध्ये असलेल्या चाकरमान्यांना घरी पोहोचणं अवघड झालं आहे. त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. ही सोय कुठे आहे?

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : मुंबई आणि उपनगरात मंगळवारी रात्रीपासून कोसळत असलेला पाऊस अद्याप कमी झालेला नाही. या पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि अनेक रस्त्यांवरही पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.  आता चाकरमान्यांना घरी पोहोचणं अवघड झालं आहे. महापालिकेनं त्यासाठी रेल्वेस्थानकाजवळ तात्पुरती राहण्याची सोय केली आहे. मध्य, पश्चिम रेल्वे सेवा बंद पडल्याने महापालिकेने ही सोय केली आहे.

महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

PHOTO : मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई, पाहा हे 10 फोटो

या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी, सतरंजी, बसण्यासाठी खुर्ची किंवा बाक इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

145 शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 145 मनपा शाळांमध्ये तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था आहे. यापैकी रेल्वे स्थानकांजवळ जवळ असणाऱ्या सर्व शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांची यादी खालीलप्रमाणे

# छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ व नऊच्या प्रवेशद्वारासमोर समोर आणि जीपीओच्या समोर असणार्‍या मनमोहन दास मनपा शाळा

# मशिद रेल्वेस्थानकाजवळ जेआर मनपा उर्दू शाळा

# मरीन लाईन्स स्टेशन जवळ श्रीकांत पाटेकर मार्गावर चंदनवाडी मनपा शाळा

# मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ गिल्डर लेन हिंदी मनपा शाळा

# ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ जगन्नाथ शंकर शेठ मनपा शाळा

# भायखळा स्थानकाजवळ सावित्रीबाई फुले मनपा हिंदी शाळा

# मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाजवळ व हाफकिन इन्स्टिट्यूटच्या बाजूला असणारी बारादेवी मनपा शाळा

# लोअर परेल पश्चिम व करी रोड पश्चिम या दोन्ही रेल्वे स्थानकांजवळ ना.म. जोशी मार्गावरील नामजोशी मनपा शाळा आणि साळसेकरवाडी येथील मनपा शाळा

# दादर पश्चिम परिसरात रेल्वेस्थानकाजवळ कबूतर खाना जवळ असणारी भवानी शंकर मनपा शाळा आणि पोर्तुगीज चर्च जवळ "गोखले रोड मनपा शाळा क्रमांक दोन"

# दादर पश्चिम व माटुंगा पश्चिम परिसरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जवळ असणारी "दादर वूलन मिल मनपा शाळा"

# माहीम स्टेशन जवळ सोनावाला अग्यारी लेन दत्तमंदिर मैदानाजवळ असणारी मोरी रोड मनपा शाळा

# वांद्रे पूर्व परिसरात खेरवाडी मनपा शाळा

# सांताक्रूझ पूर्व स्टेशन जवळ वाकोला मनपा हिंदी शाळा आणि कलिना मनपा हिंदी शाळा

# अंधेरी पश्चिम परिसरात टाटा कंपाउंड मनपा शाळा

# बोरिवली पश्चिम परिसरात प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात जवळ "सोडावला लेन मनपा शाळा"

# बोरिवली पूर्व परिसरात दत्तपाडा मनपा शाळा आणि कस्तुरबा क्रॉस लेन मनपा शाळा क्रमांक 2

# घाटकोपर पश्चिम परिसरात साई नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 2, बरवे नगर मनपा शाळा, पंतनगर मनपा शाळा

# गोवंडी स्टेशन जवळ देवनार कॉलनी मनपा शाळा

वेधशाळेनं दिला Red alert

पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने weather updates कडे लक्ष ठेवावं, असंही म्हटलं आहे.

हे वाचा RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

सोमवारी (2 सप्टेंबर) रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अॅन्टॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. बुधवारी सकाळी पावसाने कहर केला. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाच्या हजेरीने उत्साहावर पाणी फिरलं आहे.

सप्टेंबरचं रेकॉर्ड मोडलं

मुंबईत सप्टेंबरमध्ये पडणारा सरासरी पाऊस 341मिमी इतका असतो. या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच पावसाने हा विक्रम मोडला आहे. चार दिवसात तब्बल 403मिमी पाऊस झाला आहे.

-----------------------

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading