फोटो दिसणाऱ्या या चिमुरडीने मृत्यूवर मिळवला विजय, 4 तास पुरात वाहिली आणि...

फोटो दिसणाऱ्या या चिमुरडीने मृत्यूवर मिळवला विजय, 4 तास पुरात वाहिली आणि...

ममता विजय लिलका ही रात्री 2 च्या सुमारास पुराच्या भयंकर प्रवाहात वाहून गेली आणि...

  • Share this:

पालघर, 06 ऑगस्ट : सतत तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास नदी, नाल्यांना आणि अनेक गावांना पुराने वेढा घातला दिला. अशात एका चिमुरडीच्या धाडसाची एक बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक 5 वर्षीय चिमुरडी ममता विजय लिलका ही रात्री 2 च्या सुमारास पुराच्या भयंकर प्रवाहात वाहून गेली. मात्र सुदैवाने तिच्या हाती झाडाची फांदी लागली आणि ती तिने गच्च धरुन ठेवली आणि त्यामुळे तिचा जीव वाचला.

सकाळी 6 वाजता तिला शोधण्यात यश मिळालं. तिच्यावर सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी उपचार घेत असलेल्या मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

पुण्यात महिला उपसरपंचाला बर्थ डे पार्टी पडली महागात, झाला गुन्हा दाखल

दरम्यान, जिल्यासह गंजाड, रानशेत, निकणे, वधना यासह वाणगाव, गांगणगाव, आणि डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील नदी काढच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे सतत दोन दिवसापासून वीज नसल्याने डहाणू तालुक्यातील अनेक गावांना वीजे अभावी लोकांना अंधाराशी सामना करावा लागला. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. तर अनेक ठिकाणी पुराचे पाणी पुलावरुन गेल्याने पुलाला भगदाड पडल्याने वाहतुक ठप्प झाली.

मित्राच्या डोळ्यांदेखत तरुणीला उचलून नेलं, 2 नराधमांनी केला बलात्कार

काल दिवसभर व रात्री पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला व ठिकठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे पुर आले. डहाणू तालुक्या काल रात्री शेणसरी इथेही पूर परिस्थिती निर्माण झाली.

मुसळधार पावसाने झोडपलं तरी मुंबईकरांसाठी आहे आनंदाची बातमी!

पावसाच्या पाण्यामुळे आणखी एक धोकादायक प्रकार समोर आला होता. नाशिक राज्यमार्गावर गंजाड, दारु कंपनी जवळून राजेश धानमेहेर चारोटी, हा त्याच्या पत्नी आणि सहा महिन्याच्या चिमुकलीला घेऊन घरी जात असताना दुपारी 1 च्या सुमारास मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे अचानक कोसळलेल्या झाडाखाली रिक्षा सापडली. नशीब बलवत्तर म्हणून रिक्षात असलेली पत्नी व सहा महिन्याचं बाळाला कोणतीच हानी झाली नाही. झाड काढण्यास दोन तास लागले. त्यानंतर तीन वाजता वाहतुक सुरु झाली.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 6, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या