Mumbai Rain : घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरी, मुंबईकरांनो असं धाडस करू नका!

Mumbai Rain : घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरी, मुंबईकरांनो असं धाडस करू नका!

गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं अद्याप मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प आहे.

  • Share this:

मुंबई, 04 सप्टेंबर : मुंबई आणि उपनगरात मंगळवारी रात्रीपासून कोसळत असलेला पाऊस अद्याप कमी झालेला नाही. या पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यातच आता रस्त्यांवरही पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना घरी पोहोचणं अवघड झालं आहे. या सगळ्या परिस्थितीत सकाळपासून ठप्प असणारी मध्ये रेल्वेची वाहतुक तब्बल अडीच तासांनी सुरू झाली. घोटकोपर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे सोडण्यात आली.

गेल्या 24 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे बेक्कार हाल झाले. यामुळं मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली. यंदाच्या पावसाळ्यात लोकल ठप्प होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. रेल्वेसह रस्ते वाहतूक देखील मंद झाली होती. कल्याण आणि ठाण्यात राहणाऱ्या मुंबईकडे येण्याचे मार्गच बंद झाले होते. दरम्यान अडीच तासांनी सोडण्यात आलेल्या घाटकोपर-ठाणे दरम्यानच्या लोकलमध्ये स्थानकात खोळंबलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

अडीच तासांनी आलेल्या लोकलमध्ये चडण्यासाठी प्रवाशांची घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीतचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सुदैवानं यात कोणालाचा दुखापत झाली नाही. मात्र मुंबईची तुंबई झाल्यानंतर होणारे चाकरमान्यांचे हाल काही थांबत नाही.

दुसरीकडे मुसळधार पावसामुळं आणि ट्रॅकवर साचलेल्या पावसामुळं डोंबिवली रेल्वे स्थानकातून अजूनही मुंबईकडे जाणारी किंवा मुंबईहून येणारी रेल्वेसेवा उपलब्ध नाही आहे. दर एक तासाने ठाण्यासाठी एक विशेष लोकल रवाना करण्यात येत असून पुढे लोकल कधी सुरू होतील, याबाबत मात्र रेल्वेकडून कुठलीही उद्घोषणा नाही. त्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजी असून प्रवाशांची रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली आहे.

मुंबईसह या सहा राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने weather updates कडे लक्ष ठेवावं, असंही म्हटलं आहे. सोमवारी (2 सप्टेंबर) रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अॅन्टॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. बुधवारी सकाळी पावसाने कहर केला. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाच्या हजेरीने उत्साहावर पाणी फिरलं आहे.

सप्टेंबरचं रेकॉर्ड मोडलं

मुंबईत सप्टेंबरमध्ये पडणारा सरासरी पाऊस 341मिमी इतका असतो. या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच पावसाने हा विक्रम मोडला आहे. चार दिवसात तब्बल 403मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस आणखी दोन दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. वेधशाळेने बुधवारी रेड अलर्ट जारी केला आहे. गुरुवारीसुद्धा बऱ्याच भागात अतिवृष्टी होऊ शकते. पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 06:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading