मुंबईत रेल्वे मार्गांवर ३ वर्षात ५२० वेळा रूळांना गेले तडे !

मुंबईत रेल्वे मार्गांवर ३ वर्षात ५२० वेळा रूळांना गेले तडे !

२०१४ पासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत तब्बल ५२० वेळा रूळ आणि वेल्ड तुटण्याच्या घटना पश्चिम तसेच मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर घडल्या आहेत.

  • Share this:

22 डिसेंबर : मुंबई रेल्वेमार्गावर तीन वर्षात 520 वेळा रूळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यातल्या फक्त मध्य रेल्वेवरच 350हून जास्तवेळा रूळाला तडे गेले आहेत.

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल. पण ही लोकलच जर बंद पडली तर प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. गेल्या तीन वर्षात रूळांना तडे गेल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आहे.

पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय लोकल सेवा चर्चगेट ते डहाणू आणि मध्य रेल्वेची सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा आणि हार्बर रेल्वेची सेवा पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. या मार्गांवरून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. आधीच वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यातच रेल्वे मार्गावर होणाऱ्या गुन्हेगारी घटना यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आहे. गेल्या काही वर्षांत रुळाला तडा जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. रूळांना तडे गेले की रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते.

 

२०१४ पासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत तब्बल ५२० वेळा रूळ आणि वेल्ड तुटण्याच्या घटना पश्चिम तसेच मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर घडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा आणि त्यामुळेही वातावरणात बदल होत असून त्याचा फटका रुळाला बसतो, असं कारण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. त्यात रुळांच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात असणाऱ्या झोपड्यांमधून टाकला जाणारा ओला तसेच सुका कचऱ्यामुळेही रुळाची झीज होऊन त्याला धोका पोहोचतो असंही सांगण्यात आलं आहे.

एकंदरीतच काय तर मुंबईकर रोज आपला जीव मूठीत घेऊन प्रवास करत असतो. यावर तातडीने तोडगा काढणं महत्त्वाचं आहे.

First published: December 22, 2017, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading