मुंबईकरांनो, मेगा ब्लॉकचं 'हे' वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मुंबईमध्ये आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2018 09:16 AM IST

मुंबईकरांनो, मेगा ब्लॉकचं 'हे' वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मुंबई, 22 जुलै : मुंबईमध्ये आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर सकाळी सव्वा दहा ते दुपारी पावणे चारच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे या दोन्ही मार्गांवर दोन्ही ट्रॅकवर महत्वाचा काम करण्यात येईल. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते ५ या काळात जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गांसह हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/ वांद्रे मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी १० वाजून १५ मिनिटांपासून ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे ब्लॉक काळातील लोकल फेऱ्या डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त !

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक काळातील कामे रविवारी करण्यात येतील. यामुळे सकाळी ११ ते ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत लोकल वाहतूक बंद राहणार आहे. ब्लॉकदरम्यान पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येतील. या मार्गावरील प्रवाशांच्या सोईसाठी रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना दिल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

Loading...

पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते ५ या काळात जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे अप दिशेच्या लोकल फेऱ्या विरार-वसई रोड ते बोरीवलीदरम्यान धिम्या मार्गावर आणि डाऊन दिशेच्या लोकल फेऱ्या बोरीवली-विरार/वसई रोडदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

हेही वाचा...

नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून

नवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना !

सॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2018 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...