मुंबईत किती पूल बंद करणार आणि किती बांधणार ? काय आहे नेमक राजकारण

मुंबईमध्ये पुन्हा एकदा सगळ्यात जास्त वर्दळीचा असलेला लोअर परळचा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पूलावरून रोज 9 लाख लोक प्रवास करतात आणि 2 लाखापेक्षा जास्त वाहनं ये-जा करतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2018 04:06 PM IST

मुंबईत किती पूल बंद करणार आणि किती बांधणार ? काय आहे नेमक राजकारण

मुंबई, 24 जुलै : मुंबईमध्ये पुन्हा एकदा सगळ्यात जास्त वर्दळीचा असलेला लोअर परळचा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पूलावरून रोज 9 लाख लोक प्रवास करतात आणि 2 लाखापेक्षा जास्त वाहनं ये-जा करतात. हा पूल मध्य मुंबईला पूर्व-पश्चिमेस जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा पूल आहे. पण मंगळवारी अचानक हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. रहदारीसाठी हा पूल बंद करण्यात आला. त्यामुळे प्रश्न असा की आता रोज या पूलावरून प्रवास करणाऱ्यांनी जायचं कुठे?

हा पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद केला असल्याचं सांगण्यात येत आहे. पण मंडळी हा वाद जरा भलताच आहे. एकीकडे हा रोड ओव्हर पूल असल्यामुळे याचा 67 टक्के भाग हा महापालिकेचा आहे. त्यामुळे त्याला महापालिकाच दुरुस्त करणार असं म्हणणं रेल्वे प्रशासनाचं आहे. तर दुसरीकडे हा पुल रेल्वे लाईन क्रॉस करतो त्यामुळे त्याची दुरुस्ती रेल्वेनं करावी असं मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे. आता कायद्यानुसार जायचं ठरवलं तर रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पूलाच्या डागडुजीची जबाबदारी ही रेल्वेचीच असते. कारण मुंबई महापालिका दर वर्षी 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम रेल्वेला देते.

Maharashtra Bandh: औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अंधेरीच्या नंतर आयआयटीने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्यात हा पूल धोकादायक स्थितीत असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल बंद करण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत 6 रेल्वे पूल बंद करण्यात आले आहेत. आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की, एखादी वाईट घटना घडते त्यात अनेकांचे बळी जातात आणि मग असा रिपोर्ट येतो की तो पूल धोकादायक अवस्थेत होता. मग तो पुन्हा दुरूस्तीसाठी बंद करण्यात येतो. पण यात हाल होतात ते सर्वसामान्य जनतेचे. आधीच खड्डे आणि वाहतूक कोंडीने जीव जातो त्यात हे नवीन वादळ.

खरंतर जेव्हा प्रत्येक वर्षी पूलांचे ऑडिट झाल्यावर त्याची डागडूजी का होत नाही त्यासाठी एखाद्या दुर्घटनेची का वाट पहावी लागते. त्यातही एक दुर्घटना सगळेच पूल कसे काय धोकादायक होतात. जर धोकादायक पूल दुरुस्त करणं ही कायद्याने रेल्वेची जबाबदारी आहे तर रेल्वे ते काम का नाही करत.

Loading...

आता रेल्वे मंत्री पियूश गोयल हे स्वत: मुंबईकर आहेत. मग सामान्य जनतेच्या समस्या लक्षात घेत तेच यावर काही ठोस भूमिका का नाही घेत? रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेच्या या वादात मात्र सामान्य जनतेचे हाल होतायत.

हेही वाचा...

Maharashtra Bandh: औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मिस्टर बिन यांची सर्वात महागडी कार पाहिलीत का?

मराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...