आरक्षित तिकीटासाठी प्रवाशांना केलं कॅन्सर पीडित, रेल्वेनं केलं मोठं रॅकेट उद्ध्वस्त

कॅन्सर रुग्णाला कमी दरामध्ये तिकीट देण्याचा रेल्वेचा नियम आहे. त्याचाच फायदा घेत कॅन्सर असल्याचं दाखवत आरक्षित तिकीट घेण्याचा प्रकार सुरू होता.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 10:52 PM IST

आरक्षित तिकीटासाठी प्रवाशांना केलं कॅन्सर पीडित, रेल्वेनं केलं मोठं रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, 07 मे : पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने एक मोठं रॅकेट उधळून लावलं आहे. मोफत किंवा कमी दरामध्ये तिकीट मिळवण्यासाठी प्रवासी कॅन्सर पीडित असल्याचं सांगून आरक्षित तिकीट देण्य़ाचा प्रकार  समोर आला आहे. कॅन्सर रुग्णाला कमी दरामध्ये तिकीट देण्याचा रेल्वेचा नियम आहे. त्याचाच फायदा घेत कॅन्सर असल्याचं दाखवत आरक्षित तिकीट घेण्याचा प्रकार सुरू होता.

या रॅकेटमध्ये असलेले लोक आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी देशाच्या काही प्रसिद्ध कॅन्सर आजारांच्या नावांचा वापर करायचा. या प्रकरणात रेल्वे विभागाने मोठी कारवाई केली आहे. यात मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून एका व्यक्तीला अटकही करण्यात आलं आहे.


पश्चिम रेल्वेचे सीपीआरो रविंद्र भाकर यांनी सांगितलं की, रेल्वेमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी एक खास कोटा असतो. ज्यामध्ये कॅन्सर पीडित रुग्णांसाठी कमी दरात तिकीट दिलं जातं. काही लोकांनी याचाच फायदा घेत मोठा रॅकेट तयार केलं. आणि कमी दरात तिकीट मिळवण्यासाठी रुग्णांना कॅन्सर पीडित असल्याचं दाखवलं.

खरंतर, अशा पद्धतीने तिकीट मिळवणारं एक रॅकेट सक्रिय असल्याची गुप्त माहिती पश्चिम रेल्वेला मिळाली होती. त्यावर अधिक तपास केला असता मुंबई ते वाराणसी जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसच्या सेकेंड AC कोचमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.

Loading...


42 वर्षांच्या या व्यक्तीला कोणताही आजार नव्हता. पण तरीदेखील आपण कॅन्सर रुग्ण आहोत असं दाखवत त्याने आरक्षित तिकीटातून प्रवास करत होता. जबलपूरमध्ये या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान, या प्रकरणी आणखी तपास रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर यामध्ये अनेकांचा हात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.


SPECIAL REPORT : भाजपला का सतावतेय बहुमताची चिंता?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 10:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...