कारच्या चाकात अडकला भलामोठा अजगर, पाहा मुंबईतील एक्स्प्रेस वेवरचा थरारक VIDEO

कारच्या चाकात अडकला भलामोठा अजगर, पाहा मुंबईतील एक्स्प्रेस वेवरचा थरारक VIDEO

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि वन विभागाला, सर्प मित्राला दिली.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर: भला मोठा साप रस्त्यात आल्याचे अनेक प्रकार घडत असतात पण मुंबईत वर्दळ असलेल्या पूर्व द्रूतगती महामार्गावर चक्क अजगर दिसला. हा अजगर एका गाडीच्या चाकात अडकल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं सोमवारी सकाळच्या वेळात गाड्यांची पूर्व द्रूतगती मार्गावर गाड्यांची वर्दळ होती. अचानक एका कारच्या मागच्या चाकात भलामोठा साप आल्याचं लक्षात आलं कार बाजूला थांबली आणि पाहिलं तर काळजात धस्स झालं. भलामोठा अजगर चाकात अडकला होता. चाकातून बाहेर पडण्यासाठी त्याची धडपड सुरू होती मात्र जवळजाण्याची कोणात हिम्मत नव्हती. ही घटना मुंबईतील पूर्व द्रूतगती मार्गावर सोमवारी सकाळी

हे वाचा-मुसळधार पावसात पिकनिकला जाणं जीवावर बेतलं, अचानक पाणी वाढलं आणि...पाहा VIDEO

मुंबईतल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर चुनाभट्टी पिसरात जे सौमया रुगणालायसमोर असलेल्या एवराड नगर इथे एक अजगराने अर्धा ते पाऊण तास वाहतूक विस्कळीत केली होती. सोमय्या मैदानातून 8 फूट लांब अजगर या पूर्व द्रुतगती मार्गावर आला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारच्या चाकात जाऊन बसला. स्थानिकानी याची माहिती महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या सर्प मित्रांना देताच सर्प मित्र अभिरुप कदम, सिध्दार्थ गायकवाड आणि सुनिल कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने या अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

हे वाचा-खराब हवामान की, वीज पडली? शेतात कोसळले विमान, पायलट जागीच ठार

जवळपास पाऊणतास या मार्गावर सायनकडे जाणारी सर्व वाहतूक विस्कळित झाली होती. तर बघ्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. अखेर या अजगराला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर ती कार बाजूला हटवून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.

गाडीचं चाक काढून या अजगराची अखेर सुटका कऱण्यात आली. हा प्रकार पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केल्यामुळे अजगरही बिथरला होता. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याच्या अंगावर थंड पाणी टाकून त्याला पिशवी भरून सर्पमित्र घेऊन गेले. हा संपूर्ण प्रकार तिथे असलेल्या नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना सोमवारी सकाळी मुंबई परिसरात घडली.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 21, 2020, 2:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading