PMC Bankमध्ये अडकले 90 लाख रुपये, खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

PMC Bankमध्ये अडकले 90 लाख रुपये, खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या एका खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या एका खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. संजय गुलाटी (वय 51 वर्ष) असं मृत्यू झालेल्या खातेदाराचं नाव आहे. घोटाळ्यामुळे गुलाटी कुटुंबीयांचे तब्बल 90 लाख रुपये पीएमसी बँकेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला संजय यांची जेट एअरवेजमधून नोकरी गेली आणि यानंतर मेहनतीनं कमावलेले पैसे PMC बँक घोटाळ्यामुळे अडकले. हे दोन्ही धक्के गुलाटी सहन करू शकले नाहीत. सोमवारी (14 ऑक्टोबर) किला कोर्टसमोर करण्यात आलेल्या निदर्शनामध्ये संजय सहभागी झाले होते. पण यानंतर दुपारच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

(वाचा : बँकांनी बदलली कर्ज देण्याची पद्धत, आता पगार नाही तर हा स्कोअर पाहून देणार कर्ज)

दरम्यान, PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा देणारा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे. खातेदारांना बँकेतून पैसे काढण्याचं लिमिट वाढवण्यात आलं आहे. 25000 ऐवजी आता 40000 रुपये काढता येणार आहेत. बँकेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशी सुरू असल्याने ग्राहकांना भुर्दंड बसला आहे. हजारो खातेदार आपल्या हक्काचे पैसे काढता येत नसल्याने हवालदिल झाले आहेत. केंद्रीय बँकेन 23 सप्टेंबर रोजी पीएमसी बँकेवर अनेक निर्बंध लादले होते. याचदरम्यान प्रत्येक ग्राहकाला सहा महिन्यात केवळ एक हजार काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. केंद्रीय बँकेच्या या निर्णयावर बरीच टीकादेखील करण्यात आली होती.

(वाचा :  PMC बँक घोटाळा:दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाला जुनैद खान, बायकोला दिले 9 फ्लॅट्स)

PMC बँक घोटाळा : बँकेचे माजी MD जॉय थॉमस यांना अटक

पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना 4 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याआधी या बँक घोटाळ्याप्रकरणी ED ने 6 ठिकाणी छापे टाकले. जॉय थॉमस यांनी HDIL ला दिलेल्या 2500 कोटींच्या कर्जाप्रकरणी आपली चूक कबूल केली होती. सुरुवातीच्या तपासात PMC बँकेचं 4 हजार 355 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं आढळलं. PMC बँक घोटाळ्याप्रकरणी HDIL चे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनाही अटक करण्यात आली आहे. या संचालकांची 3 हजार 500 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.

(वाचा : PMC नंतर आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत!)

PMC मध्ये असलेल्या तुमच्या पैशांचे काय होणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

रिझर्व्ह बँकेच्या नोटिफिकेशननुसार पीएमसी बँकेच्या अकाउंटवरून कर्जाचा हप्ता जात असेल तर तुमच्या खात्यात असलेल्या पैशातून हप्ता कट होईल. जर तुमच्या खात्यावर पैसै नसतील तर तुम्हाला पैसे भरावे लागतील.

पीएमसी बँकेच्या खात्यावरून जर तुम्ही एसआयपी किंवा म्यूच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्यावर परिणाम होईल. कोणत्याही गुंतवणूकीसाठी तुम्हाला दुसरं खातं लिंक करावं लागेल. असं नाही झालं तर रिझर्व्ह बँक बंदी हटवेपर्यंत तुम्हाला म्युच्यूअल फंडाचा लाभ घेता येणार नाही. बँक दिवाळखोरीत निघाली तरी तुमचे पैसे बुडणार नाहीत. अशा स्थितीत खातेधारकांच्या खात्यावर असलेल्या विम्याच्या माध्यामातून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळेल. एकूण बचित जास्त असेल तर त्यापैकी काही भाग मिळू शकतो. रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असून त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. सध्या रिझर्व्ह बँकेनं बँक कर्मचाऱ्यांना वेतन, दैनिक खर्च, व्याज इत्यादी देण्यास परवानगी दिली आहे.

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या