मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प, खंडाळा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या

मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प, खंडाळा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या

सह्याद्रीच्या पट्ट्यात मान्सूनचा जोर कायम असून मुंबई ते पुणे लोहमार्गावरील (Mumbai Pune railway) खंडाळा घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प (trains stopped) झाली आहे.

  • Published by:  desk news

पुणे, 22 जुलै: राज्यात मान्सूनच्या पावसाने (Monsoon rains) जोरदार हजेरी लावली असून त्याचा प्रभाव राज्यातील वेगवेगळ्या भागांवर होत असल्याचं चित्र आहे. सध्या सह्याद्रीच्या पट्ट्यात मान्सूनचा जोर कायम असून मुंबई ते पुणे लोहमार्गावरील (Mumbai Pune railway) खंडाळा घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प (trains stopped) झाली आहे. घाटात वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून यातील काही दरडी या थेट रेल्वेच्या मार्गावर कोसळलेल्या असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरडी हटवण्याचं काम सुरू

रेल्वे मार्गावरील दरडी हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे दरडी हटवण्याच्या कामात अनेक अडथळे येत असल्याचं चित्र आहे. घाटाच्या परिसरात सध्या जोरदार वारे वाहत असून दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरूच असल्याचं सांगितलं जात आहे.

पाऊस थांबल्याची प्रतीक्षा

रेल्वेमार्ग क्लिअर करण्याचं काम सुरू असलं, तरी पावसाची स्थिती आणि दरडी कोसळण्याचं प्रमाण याचा विचार करूनच रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील सूत्रांकडून समजते आहे. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना सध्या रस्ते मार्गे प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं असून गरज असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचना प्रशासनानं केली आहे. रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी अगोदरच रेल्वे प्रशासनानं जाळ्या लावल्या आहेत. मात्र तरीही इतर काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पावसाचा जोर ओसरून दरडी हटवल्यानंतर रेल्वे सेवा सुरु होणं शक्य होणार आहे.

हे वाचा -LIVE: रत्नागिरी-खेडच्या शिरगावातला पूल गेला वाहून, 12 वाड्यांचा संपर्क तुटला

घाटमाथ्यांवर चांगला पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या विविध घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस बरसतो आहे. कर्नाटक आणि गुजरातच्या किनाऱ्यादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. ताम्हिणी घाट परिसरातही गेल्या 15 वर्षांतील रेकॉर्डब्रेक पावसाची केवळ 24 तासांत नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे शहरांची पुढच्या वर्षभराची पाण्याची बेगमीदेखील या पावसामुळे होत असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: Monsoon, Mumbai, Pune, Railway