BREAKING गेल्या दीड तासापासून पुणे- मुंबई रेल्वेसेवा ठप्प

BREAKING गेल्या दीड तासापासून पुणे- मुंबई रेल्वेसेवा ठप्प

ठाकूरवाडी ते मंकीहिलदरम्यान इलेक्ट्रिक वायरमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दीड तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : मुंबई -पुणे रेल्वेसेवा गेल्या काही दिवसांपासून अधून मधून विस्कळीत होत होती. ती सुरळीत होते न होते तोच आज पुन्हा एकदा या मार्गावर मोठा बिघाड झाला आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिलदरम्यान इलेक्ट्रिक वायरमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दीड तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

पुणे -मुंबई मार्गावर खंडाळ्याच्या घाटात काही दिवसांपासून दुरुस्तीचं काम सुरू होतं. या वर्षीच्या पावसाळ्यात दोन- तीन वेळा झालेल्या धुवांधार पावसाने या लोहमार्गाची प्रचंड हानी झाली होती. घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे देशातला हा जुना लोहमार्ग खराब झाला होता. त्याच्या दुरुस्तीचं आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे. गेल्या महिन्यात बरेच दिवस मुंबई - पुणे दरम्यानच्या काही सेवा रद्द करण्यात आल्या होत्या.

या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर नेहमीच वर्दळ असते. रोज पुणे- मुंबई ये -जा करणारे नोकरदारही असतात. ऐन संध्याकाळच्या वेळी गाड्या अडकून पडल्याने या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. ठाकूरवाडी ते मंकीहिलदरम्यानचा भाग घाटाचा भाग आहे. तिथेच बिघाड झाल्याने दुरुस्तीला वेळ लागत असल्याचं कळतं.

 

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 10, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading