आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प!

आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  • Share this:

लोणावळा, 07 जुलै: गेल्या २४ तासात लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. घटनास्थळावरून दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे आडोशी बोगद्यावजळच्या डोंगराचा काही भाग सरकून महामार्गावर आा. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आयआरबी तसेच अन्य सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. मार्गावरील दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. यासाठी मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जगबुडी नदीवरील पुलावरून एकेरी वाहतूक

रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीवरील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने काल रात्री 11 वाजल्यापासून पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने दक्षता म्हणून वाहतूक बंद ठेवली होती.

VIDEO: 'नो पार्किंग' झोनमध्ये गाडी पार्क करताय? भरावा लागेल 10 हजारांचा दंड

First published: July 7, 2019, 8:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading