मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाशी यशस्वीपणे झुंजणाऱ्या डॉ. झुंजारांना नियतीनं हरवलं, चौघांचं कुटुंब क्षणात ठार

कोरोनाशी यशस्वीपणे झुंजणाऱ्या डॉ. झुंजारांना नियतीनं हरवलं, चौघांचं कुटुंब क्षणात ठार

अपघाताची भीषण घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express way) घडली.

अपघाताची भीषण घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express way) घडली.

अपघाताची भीषण घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express way) घडली.

    मुंबई, 17 फेब्रुवारी : नियतीनं कुणाच्या आयुष्यात काय आणि कधी लिहून ठेवलं असेल सांगता येत नाही. कधीकधी असं काही घडतं की आपण निःशब्द होऊन जातो. अशीच एक अपघाताची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express way) घडली. मंगळवारी रात्री एक वाजता हा अपघात (accident) घडला. कोरोनाशी लढत आजच्या आणीबाणीच्या काळातही चोवीस तास ऑनड्युटी असणारे डॉ. वैभव झुंजार (Dr. vaibhav Zunjar) आणि आणि त्यांच्या कुटुंबीयांवर काळानं घाला घातला. डॉ. वैभव झुंजार हे मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी (vet in Mumbai Municipal Corporation) आहेत. डॉ. झुंजार यांचं काम अत्यावश्यक सेवेत (emergency services) असल्यानं त्यांना चोवीस तास ऑनड्युटी (on duty) राहावं लागतं. अशावेळी आपल्यामुळं कुटुंबाला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी कुटुंबाला गावी ठेवलं होतं. झुंजार कुटुंब नवी मुंबईत (Navi Mumbai) राहतं. कुटुंबाला त्यांनी आपल्या मूळ गावी सोलापुरात माढ्याला (Solapur Madha) ठेवलं होतं. हेही वाचादेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला दिली जाणार फाशी; एकमेव कारागृहात तयारी कोरोनाचा भर ओसरल्यानं डॉ. झुंजार कुटुंबाला घेऊन मंगळवारी 16 फेब्रुवारीला गावाकडून मुंबईकडे परतत होते. त्यावेळी खंडाळा घाटातील फूडमॉलजवळ त्यांच्या कारचं नियंत्रण सुटलेल्या कंटेनरनं जोरदार धडक दिली. कारसह इतरही तीन वाहनांना ही धडक लागली. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात घडला. स्वतः डॉ. वैभव, त्यांची पत्नी वैशाली, मुलगी श्रिया आणि आई उषा झुंजार यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा अर्णव (Son Arnav) हा एकटाच यातून आश्चर्यकारकरित्या बचावला. डॉ. झुंजार अतिशय मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते. झुंजार यांचे सहकारी आणि नातेवाईकांना यांना मोठा धक्का बसला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Corona, Mumbai muncipal corporation

    पुढील बातम्या