मुंबई, 2 डिसेंबर: माटुंगा परिसरात बुधवारी नागरिकांनी मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. माटुंगा परिसरातील रहिवाशांनी संध्याकाळच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्हणजेच पूर्व द्रुतगती मार्ग अडवून धरला. नागरिकांनी ट्राफिक पोलिसांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला.
हेही वाचा..शिवसेनेसह ठाण्यातील आणखी काही बडे नेते EDच्या रडारवर? राज्यभरात चर्चेला उधाण
नेमकं काय आहे प्रकरण?
स्थानिकांचा आरोप आहे की, ट्रॅफिक पोलिसांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या त्यांच्या गाड्यांवर नो पार्किंग अंतर्गत कारवाई केली. ई चालान केले असतानाही गाडीला लावलेले टोचन मात्र काढले नाही. गेले तीन दिवस या स्वरूपाची कारवाई केली जात असल्याने नागरिकांनी त्रस्त झाले आहे. परिणामी बुधवारी नागरिकांनी रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला. मुख्य म्हणजे या रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवासी इमारती मधले लोक गेले कित्येक वर्षे रस्त्याच्या एका बाजूला गाड्या पार्क करत आलेले आहेत.
आजवर कधीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. परंतु गेले तीन दिवस मात्र सातत्याने कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा कारवाईला तर विरोध आहेच पण सोबतच ट्राफिक पोलीस माणुसकी ही दाखवत नसल्याचा यांचा आरोप आहे. पोलिसांनी चालन केलेल्या गाड्यांचे टोचन काढावे, अशी मागणी या रहिवाशांनी केली. परंतु दंड भरल्याशिवाय चालान काढणार नाही, असा पवित्रा ट्राफिक पोलिसांनी घेतल्यानंतर नागरिक संतापले. ज्यांना गाड्यांचा वापर करायचा होता. अशा लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा गाड्यांचे टोचन काढले गेले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.
हेही वाचा..Good News: कोरोनाच्या संदर्भात आल्या दोन मोठ्या बातम्या; 2020 अखेरीस दिलासा
विशेष म्हणजे या सर्व वस्ती उच्चभ्रू लोकांच्या असून अशा पद्धतीने रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा अनेकांचा अनुभव होता. स्थानिक लोकप्रतिनिधी नेहल शहा यांनी पोलिसांना मध्यस्थी करण्यास सांगितले. परंतु संध्याकाळ होईपर्यंत सुद्धा ही समस्या सोडवली गेली नव्हती, अशी माहिती मिळाली आहे.