S M L

मुंबईतील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव, कोट्यवधीला विकली गेली इमारत

याआधीही त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता मात्र कोणीही त्या मालमत्तेसाठी किंमत लावली नाही

Updated On: Aug 9, 2018 02:51 PM IST

मुंबईतील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव, कोट्यवधीला विकली गेली इमारत

मुंबई, ०९ ऑगस्ट- मुंबईतील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेची लिलाव करण्यात आली. ३ लाख ५१ हजार रुपयांमध्ये दाऊदच्या इमारतीला लिलाव झाला. सैफी बुरानी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टने (एसबीएटी) ही इमारत विकत घेतली. दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता मात्र कोणीही त्या मालमत्तेसाठी किंमत लावली नाही. अखेर दाऊदची ही इमारती सैफी ट्रस्टने विकत घेतली. सीबीआयने १९९३ मझील मुंबईतील साखळी बॉम्ब हल्ल्यातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचे एकूण १० मालमत्ता जप्त केल्या होत्या. सैफी बुरहानी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टने २०१५ मध्ये रौनक अफरोज हॉटेलवर बोली लावली होती. मात्र तेव्हा माजी पत्रकार बालाकृष्णन यांनी हा लिलाव जिंकला होता. मात्र उरलेले पैसे ते देऊ न शिकल्यामुळे हा लिलाव रद्द करण्यात आला. २००२ मध्येही दाऊदची मालमत्ता विकत घेतलेले दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांना अजूनपर्यंत मालमत्तेवर ताबा मिळवता आलेला नाही.

हेही वाचा-

मी मराठा मोर्चाचं नेतृत्व कधीही करणार नाही - संभाजी राजे

मध्यरात्री ३ वाजता फोन करुन हा मेसेज द्यायचे शहीद मेजर कौस्तुभ राणे

मराठा आंदोलक घुसले थेट हिंजवडी आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये, केली दमबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2018 02:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close