Home /News /mumbai /

अखेर मुंबईत वीज पुरवठा झाला पूर्ववत, मध्य आणि पश्चिम रेल्वे पुन्हा सुरू

अखेर मुंबईत वीज पुरवठा झाला पूर्ववत, मध्य आणि पश्चिम रेल्वे पुन्हा सुरू

पावसाळ्यात मुंबईत वीज पुरवठा खंडित होणे काही नवीन नाही. मात्र पहिल्यांदाच अख्ख्या मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल ठप्प झाल्या आहे.

पावसाळ्यात मुंबईत वीज पुरवठा खंडित होणे काही नवीन नाही. मात्र पहिल्यांदाच अख्ख्या मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल ठप्प झाल्या आहे.

मुंबईत आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला होता. वीज ठप्प झाल्यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता.

    मुंबई, 12 ऑक्टोबर : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला होता. वीज ठप्प झाल्यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. अखेर युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा हा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व भागात आता वीज पुरवठा हा पूर्ववत झाला आहे. आज सकाळी 10.10 च्या सुमारास मुंबईसह ठाण्यातील उपनगरांमध्ये वीज पुरवठा ठप्प झाला होता.  मुंबई आणि उपनगरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत असतो. एकाच वेळी तिन्ही वीज पुरवठा कंपन्यांकडून सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.  मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली परिसरात अचानक वीज पुरवठा बंद झाला होता. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मुंबई आणि ठाण्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याचे समोर आले.  वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वीज पुरवठा हा सुरळीत झाला आहे. अनेक भागात वीज पुरवठा हा पूर्ववत झाला आहे. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला होता. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ठप्प झाल्या होत्या. सर्व स्थानकांवर लोकल  गाड्या गेल्या तीन तासांपासून जागच्या जागी थांबल्या होत्या. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबलेल्या पाहण्यास मिळाल्या. त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला होता. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबलेल्या होत्या. अखेर मध्य आणि पश्चिम मार्गावर वीज पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे दोन्ही मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या आहे. दरम्यान, 'महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. त्यावेळी सर्व भार हा सर्किट दोनवर टाकण्यात आला होता. मात्र, सर्किट दोनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता' अशी माहिती राऊत यांनी दिली. राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश दरम्यान, वीज खंडीत झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. मुंबईवर अचानक कोसळलेल्या या वीज संकटामुळे गोंधळ उडाला होता. नेमका वीज पुरवठा का आणि कशामुळे खंडीत झाला होता, याबद्दल आता राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या