मुंबईत बत्ती गूल, लोकल जागच्या जागी थांबल्या, पहिला VIDEO
मध्य रेल्वेवर लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्या आहे. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबल्या आहे. गेल्या अर्ध्या तासापासून प्रवासी लोकलमध्ये खोळंबले आहे.
मुंबई, 12 ऑक्टोबर : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत बत्ती गूल झाली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली परिसरात वीज पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मुंबईत एकाच वेळी वीज पुरवठा ठप्प झाल्याच्या घटनेमुळे गोंधळ उडाला आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
मध्य रेल्वेवर लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्या आहे. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबल्या आहे. गेल्या अर्ध्या तासापासून प्रवासी लोकलमध्ये खोळंबले आहे.
वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबलेल्या आहे.
कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले आहे. टाटा पॉवरकडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे 380 मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसला आहे.