• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईतील वीज गायब प्रकरण: अहवालातून समोर आली मोठी माहिती

मुंबईतील वीज गायब प्रकरण: अहवालातून समोर आली मोठी माहिती

मुंबईत २२ ऑक्‍टोबरला सकाळी काही तास संपूर्ण मुंबईची वीज खंडित झाली होती. हा सायबर हल्ला आहे अशा पद्धतीचे प्रतिक्रिया ऊर्जा विभागान?

  • Share this:
मुंबई, 8 जून: 22 ऑक्टोबर 2020 हा दिवस मुंबईच्या (Mumbai) इतिहासात आजपर्यंत न घडलेला असा प्रकार घडलेला दिवस होता. मुंबईसारखा कधीही वीज पुरवठा खंडित न होणाऱ्या महानगरीत एक-दोन नाही तर काही भागात आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडित (Power outage in Mumbai) झाला होता. त्यामुळे कोरोनाच्या अशा परिस्थितीतून हळूहळू बाहेर येणाऱ्या मुंबईला काही तासांसाठी मोठा ब्रेक लागला होता. मुंबईचा पूर्णपणे वीज पुरवठा खंडित होण्याचा हा पहिलाच प्रकार होता. मुंबईतील वीज गायब प्रकरणाबाबत शासनाने सारवासारव करताना हा सायबर हल्ला आहे असे सांगितले होते आणि तसा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवलेला होता आता मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने या प्रकारासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल पुढे आलेला आहे. या अहवालात हा सायबर हल्ला नाही असे स्पष्ट म्हटलेले आहे. त्यामुळे हा सायबर हल्ला नाही असे सांगणाऱ्या माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA Government) ऊर्जा मंत्र्यांना धारेवर धरलं आहे. त्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण सभागृहात खोटा अहवाल ठेवणाऱ्या ऊर्जामंत्री आणि त्यांना मदत करणाऱ्या माजी गृहमंत्री यांनी सभागृहाची माफी मागावी आणि नवीन अहवाल पटलावर ठेवावा अशी मागणी केलेली आहे. पावर ग्रिड चार दिवस बंद पडलेला असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्यातून हा प्रकार घडलेला आहे. ऊर्जा मंत्री आणि गृहमंत्री यांचे अज्ञान आता उघडे पडलेले आहे. त्यांनी आमची चूक झाली असे मान्य करायला हवे होते. आमच्यामुळे मुंबई अंधारात गेली हे मान्य केले असते तर ही वेळ आली नसती. आता मात्र खोटा अहवाल मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर येणार आहे. याप्रकरणात सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव आणला जाऊ शकतो असंही माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे. या अहवालामुळे आता पुन्हा एकदा ऊर्जा मंत्र्यांवर नामुष्कीची वेळ येणार आहे. मुंबई वीज पुरवठा खंडित होणे यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष हेच कारण असल्याचे उघडकीस आलेले आहे.
Published by:Sunil Desale
First published: