मुंबई बत्ती गुल प्रकरणी चौकशी समितीने केले धक्कादायक खुलासे

मुंबई बत्ती गुल प्रकरणी चौकशी समितीने केले धक्कादायक खुलासे

अशा आणीबाणीच्या काळी लागणारी व्यवस्थापन यंत्रणेची आपल्याकडे कमतरता आहे. त्याला wide area management प्रणाली म्हटलं जातं. ही यंत्रणा गुजरातकडे आहे, पण महाराष्ट्रात नाही.

  • Share this:

मुंबई 20 नोव्हेंबर: मुंबईत बत्ती गुल झाल्यानंतर (Mumbai power cut issue) राज्यसरकारने एक समिती गठीत (Inquiry committee) केली होती. या समितीने सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ऊर्जामंत्र्यांनी दावा केल्याप्रमाणे घातपात झाला नाही किंवा सायबर हल्लाही झाला नसल्याचं या अहवालात नमूद केलं गेलाय. या समितीचे सदस्य असलेल्या IITचे प्राध्यापक श्रीवर्धन सोमण यांनी ही माहिती दिलीय.

सोमण म्हणाले, कोणताही घातपाताची झाला नाही किंवा सायबर Attackही झाला नाही. महाराष्ट्र स्टेट लोड Dispatch सेंटर या संस्थेकडून चूक झाली. अशा आणीबाणीच्या काळी लागणारी व्यवस्थापन यंत्रणेची आपल्याकडे कमतरता  आहे.

त्याला wide area management प्रणाली म्हटलं जातं. ही यंत्रणा गुजरातकडे आहे, पण महाराष्ट्रात नाही. फेजर मेझरमेन्ट युनिट ज्याचा शोध एका मराठमोळ्या प्राध्यापकांनी लावला, जो अमेरिकेत 2000 पासूनच वापरला गेला, पण आपल्याकडे मात्र नाही अशी माहितीही त्यांनी दिली. एसएलडीसीमध्ये आधुनिक तंत्रज्ञांनाची कमतरता आहे आणि ती अपग्रेड करण्यातली उदासीनता याला कारणीभूत ठरली असं मतही सोमण यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्याने या राज्याने पुन्हा घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलातून 100 युनिटपर्यंत वीज माफ करणार, असा मी शब्द दिला होता. राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे. मागील भाजप सरकारनं केलेल्या थकबाकीच्या पापाचं काय? असा सवाल देखील ऊर्जामंत्र्यांनी उपस्थित केला.

वीज बिल माफ करण्यासाठी समिती देखील गठीत केली. पण कोरोना काळात बैठका होऊ शकले नाही, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी स्पष्ट केलं.

नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना सांगितलं की, 100 युनिट वीज माफ यासाठी भूमिका आज बदललेली नाही. भाजप नेत्यांनी वाढीव वीजबिल घेऊन माझ्या कार्यालयात यावे, मी चर्चा करायला तयार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. पण मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून नंतरच 100 युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. असं काम सुरू आहे, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट सांगितलं.

Facebook Messenger चं नवीन फीचर, आपोआप होतील मेसेज डिलीट; असं करेल काम

वीज कंपन्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती पत्रकारांना देतानाच नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महावितरण कंपनीची मार्च 2014ची अखेरची थकबाकी 14 हजार 154 कोटी होती. ही थकबाकी आता 59 हजार 14 कोटी इतकी आहे. माजी ऊर्जामंत्र्यांनी चांगलं काम केलं, असा भाजपकडून दावा केला जात आहे. पण आकडेवारी मात्र वेगळेच सांगत आहे, असा टोला नितीन राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 20, 2020, 6:08 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या