Home /News /mumbai /

वीज पुरवठा खंडीत झाल्यानं मुंबईतील सर्व रुग्णालयं व्हेंटिलेटरवर! BMCनं सुरू केली तयारी

वीज पुरवठा खंडीत झाल्यानं मुंबईतील सर्व रुग्णालयं व्हेंटिलेटरवर! BMCनं सुरू केली तयारी

दरम्यान वीज पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर रुग्णालयातील रुग्णांवरही परिणाम होऊ शकत. प्रत्येक रुग्णालयाचा विजेचा बॅकअप आणि जनरेटरच्या सुविधा असल्या तर त्या किती वेळ चालतील? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

    मुंबई, 12 ऑक्टोबर : पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई परिसरांतील गेलेला वीज पुरवठा साधारण पाऊन ते एक तासात पुर्वपदावर येईल अशी माहिती उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. मात्र सध्या सर्व लोकल गाड्या गेल्या अर्ध्यातासापासून एकाच जागेवर आहेत. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट इलेक्ट्रीकने ट्वीट करून माहिती दिली आहे. 'टाटा इलेक्ट्रिककडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.' अशी माहिती बेस्टने दिली आहे. तसंच, झालेल्या गैरसोयीबद्दल बेस्टने दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान वीज पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर रुग्णालयातील रुग्णांवरही परिणाम होऊ शकत. प्रत्येक रुग्णालयाचा विजेचा बॅकअप आणि जनरेटरच्या सुविधा असल्या तर त्या किती वेळ चालतील? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे विजेचा पुरवठा पूर्ववत होण रुग्णालयातील रुग्णांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. दरम्यान, मुंबई पालिकेच्या वतीनं 022-22694727, 022-226947725 आणि 022-22704403 या क्रमांकावर आतपकालीन मदतीसाठी फोन करण्याचे आवाहन केले आहे. वाचा-मुंबईत का झाली बत्ती गूल? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया, VIDEO वाचा-मुंबईमध्ये Blackout! हे आहेत शहरातील या क्षणाचे महत्त्वाचे 10 अपडेट याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल चहल यांनी सांगितले की, सर्व रुग्णालये कमीतकमी आठ तास डिझेलचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी त्यांच्या संबंधित SWM ट्रान्सपोर्ट गॅरेज अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. आयसीयूमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारचा वीज बिघाड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच, आपत्ती नियंत्रण आणि CE M&E दोन तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत राहिल्यास MOBILE DG SET वाहने पोहचवण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. दुसरीकडे, मुख्य समस्या कळव्यामध्ये असल्याचे समोर आले आहे. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 मध्ये देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भाग प्रभावित आहे. वाचा-मुंबईत वीज पुरवठा ठप्प होण्याचे कारण आले समोर, बेस्टने केला खुलासा वाचा-पहिल्यांदाच अख्ख्या मुंबईचे लाईट गेले! लोकल, ऑफिसं सर्व ठप्प; पाहा PHOTOS लोकल सेवा ठप्प टाटा पॉवर कंपनीच्या ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे 10 वाजून 5 मिनिटांनी ट्रॅक्शन पॉवरमध्ये व्यत्यय आला. त्यानंतर चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान सेवा बंद करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम थेट लोकल सेवांवर झाला. सर्व स्थानकांवर लोकल थांबलेल्या आहे. मध्य रेल्वेवर लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्या आहे. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबल्या आहे. केवळ मध्यच नाही तर पश्चिम रेल्वेही ठप्पही झाली आहे,
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या