मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO : JNU हिंसाचार: मुंबईतल्या निदर्शनांमध्ये झळकले FREE KASHMIRचे पोस्टर

VIDEO : JNU हिंसाचार: मुंबईतल्या निदर्शनांमध्ये झळकले FREE KASHMIRचे पोस्टर

 तुमच्या नाकाखाली असे पोष्टर्स लागतातच कसे असा सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केलाय.

तुमच्या नाकाखाली असे पोष्टर्स लागतातच कसे असा सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केलाय.

तुमच्या नाकाखाली असे पोष्टर्स लागतातच कसे असा सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केलाय.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 06 जानेवारी : JNU हिंसाचार प्रकरणी निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियावर विरोध प्रदर्शन सुरू आहे. या निदर्शनांना आता वेगळं वळणं मिळालं आहे. मुंबईतले विद्यार्थी या ठिकाणी निदर्शने करत असून बॉलिवूडचे अनेक अभिनेते या स्थळी दाखल झाले आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांनी या विरोध प्रदर्शनांमध्ये FREE KASHMIRचे पोस्टरचे पोस्टर्स झळकविल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावरून उद्धव ठाकरे यांना सवाल केलाय. मुख्यमंत्री कार्यालयापासून केवळ 2 किमी अंतरावर ही प्रदर्शने होत आहेत. हे कसं खपवून घेतलं जातंय असाल सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय.

फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. आझादी गँगकडून ज्या प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत त्या आक्षेपार्ह असून मुंबईत हे कसं सहन केलं जातंय असा सवाल त्यांनी केलाय. तुमच्या नाकाखाली असे पोष्टर्स लागतातच कसे असा सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्रत्री ठाकरेंना केलाय. तर आझादीचा अर्थ हा देशापासून वेगळं व्हावं असा नसून काश्मीर दडपशाहीपासून आणि सुरक्षा दलांपासून मुक्त व्हावा असा आहे असा दावा आंदोलकांकडून केला जातोय.

औरंगाबादमध्येही राडा

राजधानी दिल्लीतल्या JNU हिंसाचाराचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत. मुंबई पाठोपाठ राज्यातल्या इतर शहरांमध्येही आता विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेनं आज आक्रमक आंदोलन केलं. रविवारी JNU मध्ये विद्यार्थ्याच्या एका गटाने लोखंडी रॉड आणि सळ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या हिंसाचारावरून डाव्या विद्यार्थी संघटना आणि भाजपची संबंधीत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. रविवारी JNU मध्ये वातावरण तापलं होतं. त्या घटनेचा विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निषेध केलाय.

JNUमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला 26/11ची आठवण करून देणारा - उद्धव ठाकरे

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने भाजपच्या शहर कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. 25 ते 30 कार्यकर्ते भाजपच्या ऑफिसजवळ आले होते. अतिशय आक्रमक घोषणाबाजी करत ते ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलीस सकाळपासूनच भाजपच्या कार्यालयात उपस्थित असल्याने हल्ल्याचा प्रयत्न उधळला गेला असा दावा भाजपने केलाय.

दिलेला शब्द पाळणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार - संजय राऊत

नाशिकमध्येही राडा

नाशिकमध्ये (nashik) राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यालयावर धडक दिली. यावेळी हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर ABVPचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी यावेळी दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

First published: