Mumbai पोलिसांची Idea; ‘मॅग्नेटो’ची मदत घेत मास्क वापरण्यासंबंधी जनजागृती

Mumbai पोलिसांची Idea; ‘मॅग्नेटो’ची मदत घेत मास्क वापरण्यासंबंधी जनजागृती

मुंबई पोलिसांनी मास्क वापरण्याचा संदेश देण्याकरता ‘एक्स-मेन: फर्स्ट क्लास’या प्रसिद्ध चित्रपटातील एका दृश्याचा वापर करून एक मिम तयार केले आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल: कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Virus Infection) अतिशय वेगानं वाढत असल्यानं देशात कोविड -19च्या (Covid-19) रुग्णांची संख्याही आवाक्याबाहेर वाढत आहे. त्यामुळं ही साथ आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले जात आहेत. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून येत असून ,राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 68 हजार 631 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मास्क (Mask) घालणे आणि सोशल डिस्टंन्सिंगसंदर्भात (Social Distancing) जागरूकता वाढविण्याच्या कामात पोलिसांनीही पुढाकार घेतला असून, यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक अनोखी शक्कल लढवली आहे.

मुंबई पोलिसांनी मास्क वापरण्याचा संदेश देण्याकरता ‘एक्स-मेन: फर्स्ट क्लास’ (X Men: First Class) या प्रसिद्ध चित्रपटातील एका दृश्याचा वापर करून एक मिम (Meme) तयार केले आहे. हे मिम सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासंदेशात ‘एक्स-मेन: फर्स्ट क्लास’ या चित्रपटातील अभिनेता मायकेल फासबेंडरनं (Michael Fassbender) साकारलेल्या मॅग्नेटो (Magneto) या व्यक्तिरेखेचे स्क्रीनशॉट्स वापरुन, अ‍ॅनिमेटेड मुलाबरोबर ग्राफिक्स करून मास्क घालण्याची योग्य पध्दत दाखवण्यात आली आहे.

वाचा: कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार! Johnson & Johnson Corona vaccine चे दोन नाही तर फक्त एकच डोस घ्यावा लागणार

‘सर्वप्रकारचं संयोजन केलं तरी एकच गोष्ट तुमचे रक्षण करू शकते. तेव्हा मास्क व्यवस्थित घाला!’ असं कॅप्शन या मिमला देण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये मास्क घालण्याची योग्य पद्धत दर्शवण्यात आली असून, ही पोस्ट इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल झाली आहे. सर्वात लोकप्रिय झालेल्या पोस्टमध्ये प्रथम मास्क लावणाऱ्या व्यक्तीनं मास्क गळ्यावर लावल्याचं दिसत आहे, तर दुसऱ्या चित्रात मास्क लावला आहे; मात्र नाक उघडंच आहे मग शेवटच्या टप्प्यात मास्क व्यवस्थित लावलेला दिसत आहे.

पोलिसांच्या या युक्तीमुळे नेटिझन्स प्रभावित झाले असून, त्यांनी या पोस्टबद्दल पोलिसांचे कौतुक केलं आहे. या पोस्टला अल्पावधीतच दहा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युजर्सनी मुंबई पोलिसांच्या ‘सोशल मीडिया गेम’ बद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, ‘परफेक्ट’ ‘नाईस’ अशा प्रतिक्रिया युजर्सनी व्यक्त केल्या आहेत. त्याचवेळी अशा साध्या सोप्या नियमांचे पालन नकरणाऱ्या लोकांवर विशेषतः राजकारण्यांवर नागरिकांनी ताशेरे ओढले असून आपला संताप व्यक्त केला आहे. ‘राजकारण्यांना मुखवटे घालायला सांगा’, असं एका युजरनं म्हटलं असून, एकानं पोलीस अधिकारी आणि हवालदारांना मास्क घालायला सांगा, असंही एका युजरनं म्हटलं आहे.

कोरोना साथीची सुरुवात झाल्यापासून मुंबई पोलिसांनी जनजागृतीसाठी सोशल मीडियावर अनेक मेसेजेस प्रसारित केले असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

First published: April 20, 2021, 7:53 PM IST

ताज्या बातम्या