मुंबई पोलीस पुन्हा चर्चेत, हार्दिक पांड्याला 'असा' लगावला टोला

मुंबई पोलीस पुन्हा चर्चेत, हार्दिक पांड्याला 'असा' लगावला टोला

मुंबई पोलिसांनी एक ट्वीट करत एक चांगला खेळाडू होण्यासाठी कशाची गरज असते हे सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल सध्या एका वादमुळे चर्चेत आहेत. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात पांड्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर देशभरातून मोठी टीका झाली. आता मुंबई पोलिसांनीही हार्दिकला टोला लगावला आहे.

मुंबई पोलिसांनी ट्वीट करत एक चांगला खेळाडू होण्यासाठी कशाची गरज असते हे सांगितलं आहे. 'महान खेळाडू कसा होतो? मैदानावर जास्त धावा....मैदानाबाहेर महिलांचा जास्त सन्मान,' असं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे.हार्दिक,राहुल का आहेत वादात?

कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के. एल राहुल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात या दोघांनी केलेल्या लूज कमेंट्समुळे हे दोन खेळाडू अडचणीत आले आहेत.

हार्दिक पांड्यानं स्त्रियांविषयी केलेली वक्तव्य सेक्सिस्ट असल्याचे आरोप झाले आणि त्यावर पांड्याने माफीही मागितली. मला स्त्रियांच्या हालचालींचं निरीक्षण करायला आवडतं, अशा अर्थाचं वक्तव्य हार्दिक पांड्याने करण जोहरने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केलं होतं.


VIDEO : औरंगाबादेत रामदास आठवलेंच्या सभेत मोठा राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 07:13 AM IST

ताज्या बातम्या