सकाळी पुलाला तडे,संध्याकाळी वाहतूक सुरळीत कशी ?

सकाळी पुलाला तडे,संध्याकाळी वाहतूक सुरळीत कशी ?

अंधेरी इथल्या गोखले पुलाचा काही भाग काल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानंतर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर ढकलणाऱ्या मुंबई मनपाला मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै : अंधेरीच्या फुट ओव्हर ब्रिज दुर्घटनेपाठोपाठ आता मुंबईतील ग्रँटरोड रेल्वे स्थनकाजवळील पुलाला तडे गेले असल्याची बाबसमोर आली आहे. त्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी सहा तासांनंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

अंधेरीतील दुर्घटनेला 24 तासही पूर्ण होत नाही तोच ग्रँटरोडची बाब समोर आल्याने, मुंबई पोलिसांनी बुधवारी ट्विट करुन या पुलावरील वाहतूक नाना चौकातून केनडी ब्रिजकडे वळवली आहे.

मुंबई पोलिसांद्वारा जारी करण्यात आलेल्या छायाचित्रात पुलाला गेलेले तडे स्पष्ट दिसताहेत.

 

ग्रँटरोड आणि नाना चौकाला जोडणाऱ्या या पुलाला तडे गेले असल्याची बाब लक्षात येताच पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी या पुलावरील रहदारी बंद केली होती.​

अखेर संध्याकाळी ग्रँट रोड स्टेशनबाहेरचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळी पुलाला तडे गेल्यानं डागडुजीसाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी पूल बंद केला होता. आता दोन्ही बाजुंनी या पुलावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील अंधेरी इथल्या गोखले पुलाचा काही भाग काल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानंतर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर ढकलणाऱ्या मुंबई मनपाला मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय. जेव्हा कोणताही असा अपघात होतो, तेव्हा पालिकेचे नगरसेवक आणि वॉर्ड ऑफिसर्स यांना कधीच का जबाबदार धरले जात नाही असा परखड सवाल मुंबई हायकोर्टानं विचारला आहे.

हेही वाचा

मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!

पश्चिम रेल्वे पुन्हा कोलमडली, अंधेरी- चर्चगेट स्लो ट्रॅकवरच्या गाड्या रद्द

मुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा?

सोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी ?

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 08:35 PM IST

ताज्या बातम्या