Home /News /mumbai /

एका उंदरामुळे मुंबई पोलिसांना सापडलं महिलेचं 10 तोळे सोनं; चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे संपूर्ण घटना

एका उंदरामुळे मुंबई पोलिसांना सापडलं महिलेचं 10 तोळे सोनं; चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे संपूर्ण घटना

ती दागिने घेऊन बँकेत जमा करण्यासाठी जात होती. रस्त्यात तिला दोन मुलं दिसली. रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना खूप भूक लागली होती. या महिलेकडे पिशवीत काही वडापाव होते. तिने ती पिशवी या मुलांना दिली आणि पुढे निघून गेली

मुंबई 17 जून : जगात कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कोणाला कचऱ्यात सोनं मिळू शकतं, तर कोणी चुकून महागडं असं सोनंच कचऱ्यात फेकून देतं. मुंबईत (Mumbai Police) असाच एक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचे आपल्या कष्टाने कमावलेले तब्बल 10 तोळे सोन्याचे दागिने तिच्याच एका चुकीमुळे चक्क कचऱ्यात (Mumbai lost Gold) गेले. मात्र खरी आश्चर्यचकित करणारी गोष्ट तर पुढे आहे. ही महिला जेव्हा पोलिसांकडे पोहोचली, तेव्हा पोलिसांनी कचरापेटीतील उंदराचा माग घेत तिला तिचे दागिने परत मिळवून दिले. 13 जून 22ला ही घटना घडली. मुंबईतील मालाड पूर्व भागातील दिंडोशी येथील एका महिलेबाबत हा किस्सा घडला. ही महिला घरकाम करते. या महिलेने आपल्या पगारातून पैसे वाचवून सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने (Gold jewellery) तयार केले होते. मात्र आपल्या निष्काळजीपणामुळे तिने ते सोनं गमावलं. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही तपास करत कचरापेटीतील एका उंदराचा माग घेत (Mumbai police seized gold from Rat) हे सोनं परत मिळवलं. हाताची नस कापून मुंबई उच्च न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न; माजी सैनिकाचं धक्कादायक पाऊल कसे हरवले दागिने? या महिलेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती दागिने घेऊन बँकेत जमा करण्यासाठी जात होती. रस्त्यात तिला दोन मुलं दिसली. रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना खूप भूक लागली होती. या महिलेकडे पिशवीत काही वडापाव होते. तिने ती पिशवी या मुलांना दिली आणि पुढे निघून गेली. पुढे गेल्यानंतर तिने पर्समध्ये पाहिलं, तर त्यात दागिने नव्हते. तेव्हा तिच्या लक्षात आलं, की वडापावसकट तिने या मुलांना दागिन्यांची पिशवी दिली आहे. ती लगेच त्या ठिकाणी परत गेली, मात्र ही मुलं तोपर्यंत निघून गेली होती. पोलिसांनी असा लावला शोध यानंतर महिलेने पोलिसांकडे जात सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींच्या मदतीने या मुलांची ओळख पटवली. या मुलांना शोधत पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. मुलांनी सांगितलं, की त्यांना वडापाव खायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी ती पिशवी न उघडताच कचऱ्यात फेकून दिली. यानंतर पोलिसांनी कचऱ्याच्या कंटेनरची तपासणी केली, मात्र सोनं मिळालं नाही. नात्यातील भयंकर रूप : एकाने आईला क्रूरपणे मारलं तर मुंबईत आईने स्वत:च्या लाडक्या 19 वर्षीय लेकीला संपवलं पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज (Mumbai police found gold with help of Rat) तपासल्यानंतर लक्षात आलं, की एका उंदराने पाव (Rat took gold with bread) खाण्यासाठी ही पिशवी ओढत खाली गटारात नेली होती. यानंतर गटाराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना ती दागिन्यांची पिशवी मिळाली, आणि त्यांनी महिलेला ती परत केली. यानंतर महिलेने पोलिसांचे आभार मानले. एखाद्या चित्रपटातील वाटावी अशा या घटनेचा सिनेमाप्रमाणेच हॅप्पी एन्ड झाल्यामुळे महिला आणि पोलिसांनीही समाधान व्यक्त केलं.
First published:

Tags: Gold, Mumbai Poilce

पुढील बातम्या