S M L

मुंबई पोलिसांना मिळणार नवी टोपी

कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारापर्यंतच्या अंमलदारांसाठी ही नवी टोपी असेल.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 11:11 AM IST

मुंबई पोलिसांना मिळणार नवी टोपी

मुंबई,25 सप्टेंबर: मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता नवी टोपी दिसणार आहे. ४० हजारांवर मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता जुन्या पारंपरिक टोपी ऐवजी आकर्षक कॅप पाहावयास मिळणार आहे. कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारापर्यंतच्या अंमलदारांसाठी ही नवी टोपी असेल.

मुंबई पोलीसांची नवी टोपी गणवेशाचा एक भाग होणार आहे. पूर्ण गणवेश आणि ड्युटीवर कार्यरत असताना ही टोपी घालता येणार आहे. खासगी कपडे किंवा अर्धवट गणवेशात असताना टोपी डोक्यावर घालता येणार नाही. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या पोलीस कॅन्टीन तसेच नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलाच्या (एलए) कॅन्टीनमध्ये उपलब्ध आहेत.

सध्या प्रत्येक पोलिसाला केवळ एकच टोपी खरेदी करता येणार असून, दुस-या टप्प्यात आणखी नव्या टोप्या मागवण्यात आल्यानंतर त्यांना आणखी एक घेता येणार आहे. नव्या कॅपसाठी ७२.९२ रुपये मोजावे लागणार असून, त्यांना दोनपेक्षा अधिक टोप्या खरेदी न करण्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही नवी कॅपची कल्पना अंमलात आणली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 11:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close