काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना अटक

काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना अटक

मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीची जबाबदारी मनसेनं स्वीकारली, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीये.

  • Share this:

01 डिसेंबर : मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीअंती आठही जणांना अटक करण्यात आलीये. उद्या शनिवारी आठ जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मनसे विरुद्ध संजय निरुपम वाद आता आणखी चिघळलाय. आज सकाळी काही अज्ञातांनी कॉंग्रेसचं कार्यालय फोडलं, मात्र नंतर हे कार्यालय आपण फोडल्याची जबाबदारी मनसेनं घेतली. त्याबाबतचं ट्वीटसुद्धा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेनी केलंय. 'भैय्या निरुपम वर सर्जिकल स्ट्राईक, इट का जवाब पथ्थरसे' असं ट्वीट यानंतर संदीप देशपांडेंनी केलं होतं. आझाद मैदान  पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना दुपारी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर देशपांडे यांच्यासह आठही जणांना अटक करण्यात आलीये. संदीप देशपांडेसह 8 कार्यकर्त्यांवर  या कार्यकर्त्यांवर दंगा करणे, ट्रेस पासिंग म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेत जबरदस्तीनं घुसणे, दुसऱ्यांची मालमत्तेची तोडफोड करणे, मुंबई पोलीस कायदा अशा अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उद्या आठही कार्यकर्त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 06:10 PM IST

ताज्या बातम्या