• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • रश्मी शुक्लांनंतर सुबोध जैस्वालांचा नंबर, मुंबई पोलिसांनी बजावला समन्स!

रश्मी शुक्लांनंतर सुबोध जैस्वालांचा नंबर, मुंबई पोलिसांनी बजावला समन्स!

सुबोध कुमार जैस्वाल हे पोलीस महासंचालक असताना राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसंच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते.

सुबोध कुमार जैस्वाल हे पोलीस महासंचालक असताना राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसंच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते.

सुबोध कुमार जैस्वाल हे पोलीस महासंचालक असताना राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसंच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते.

  • Share this:
मुंबई, 09 ऑक्टोबर : केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य तपास यंत्रणा यांच्यातील वाद सुरूच आहे. फोन टॅपिंग प्रकरणी (phone tapping case) वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता सीबीआयचे चीफ सुबोध कुमार जैस्वाल ( CBI chief Subodh Jaiswal ) यांना मुंबई पोलिसांनी (mumbai police) समन्स बजावला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने हा समाज बचावलेला असून 14 ऑक्टोबरपर्यंत सुबोध कुमार जैस्वाल यांना जबाब देण्यासाठी हजर राहण्याचे नमूद करण्यात आले आहे. सुबोध जैस्वाल यांना हा समन्स ई-मेल द्वारे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पाठवलेला आहे. सुबोध कुमार जैस्वाल हे पोलीस महासंचालक असताना राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसंच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते. याबाबत एक अहवाल देखील त्यांनी तयार केला होता याच प्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात युद्ध छेडले असून रश्मी शुक्ला यांना या प्रकरणी जबाब देण्यास मुंबई पोलिसांनी भाग पाडले. पाळत ठेवण्यासाठी सुनेच्या बेडरूममध्ये लावला CCTV; सासू, सासरा आणि नणंदेचं भयंकर सुरुवातीला मुंबईला हजर राहून जबाब नोंदवावा असा समज मुंबई सायबर सेलने रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांना पाठवला होता. तर हैदराबाद येथे एका वरिष्ठपदावर कार्यरत असल्याने शिवाय कोरोना महामारी असल्याने आपण जबाब नोंदवायला हजर राहू शकत नाही, असं रश्मी शुक्ला यांनी ई-मेलद्वारे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला कळवले होते. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. शेवटी मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांचा जबाब हैदराबाद येथे जाऊन नोंदवला. या गोष्टीला काही दिवस उलटले असताना आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने थेट सीबीआयचे चीफ सुबोध कुमार जैस्वाल यांना जबाब नोंदवणार आहे. यासाठीच त्यांना हजर राहण्याचा समन्स बजावलेली आहे. थेट सीबीआय चीफला अशा पद्धतीने जबाब नोंदवण्या करता समन्स देऊन मुंबई पोलिसांनी हे पुन्हा एकदा स्पष्ट केलेला आहे की मुंबई पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यातील वाद संपलेला नाही. हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबरनंतर कोरोनाची तिसरी लाट येणार? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती तर नुकतच अनिल देशमुख शंभर कोटी वसुली प्रकरणी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना जबाब नोंदवण्यात करता हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून मुंबई पोलिसांनी थेट सीबीआय चीफ जबाह नोंदवण्याकरता समन्स बजावलेले आहे. यावरून येत्या काही दिवसांत देशात महाराष्ट्र राज्य सरकार विरुद्ध केंद्र असा संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह आहे.
Published by:sachin Salve
First published: