मुंबई, 31 जानेवारी : सध्या लोकांना नियम समजावून सांगण्यासाठी पोलिसांकडून हटके मार्ग वापरले जात आहेत. अनेकदा ट्राफीक पोलिसांनी वेगवेगळे व्हिडिओ, कार्टून, फोटो, गाणी यांचा वापर करून वाहनचालकांना सावध केलं आहे. आता मुंबई पोलिसांनी ट्राफीक जॅम झाल्यानंतर हॉर्न वाजवण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. याचा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.
मुंबई पोलिसांनी म्हटलं की, हे डेसीबल मिटर रस्त्यावर गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ऐकून त्यानुसार काम करतं. या मीटरमध्ये 85 डेसिबलची लेवल सेट करण्यात आली आहे. त्यानुसार सिग्नलवर याचे नियंत्रण राहते.ट्राफीक सिग्नल लागल्यानंतर जेव्हा 85 डेसिबल पेक्षा जास्त आवाज असेल तर रेड ट्रॅफिक लाइटचे वेटिंग टाइम आवाजानुसार वाढेल. म्हणजेच जर ट्रॅफिक लाइट रेड असेल आणि आवाज 85 डेसिबल पेक्षा वाढला तर त्याचे टायमिंग 90 सेकंदापर्यंत वाढेल.
Horn not okay, please! Find out how the @MumbaiPolice hit the mute button on #Mumbai’s reckless honkers. #HonkResponsibly pic.twitter.com/BAGL4iXiPH
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 31, 2020
सिग्नलचे टायमिंग वाढण्याची ही प्रक्रिया आवाज 85 डेसिबल कमी होईपर्यंत सुरू राहिल. सध्या या मीटरची चाचणी घेतली जात असून लवकरच ही इतरत्र लावली जातील. पोलिसांनी म्हटलं आहे की, जिथं ट्रॅफिक जास्त असतं असा ठिकाणी मीटर लावण्यात येईल.
ऑनलाईन रेल्वे तिकीट काढण्याआधी हे वाचा! IRCTC ने दिलाय ऑनलाईन फ्रॉडचा Alert
लोकांनीही मुंबई पोलिसांच्या या भन्नाट कल्पनेचं कौतुक केलं आहे. दरम्यान, काही लोकांनी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांचा आवाज कमी करण्यासाठीही असंच काहीतरी करा असंही म्हटलं आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटवर बेंगळुरू पोलिस आयुक्त भास्कर राव यांनी आपल्या शहरातही हे तंत्रज्ञान लागू करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.
वाचा : WhatsApp वर चॅट करताना या चुका केल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा, नियम वाचलेत का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police, Traffic rule