• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • आचारसंहिता लागू होताच मुंबई पोलिसांना सापडलं घभाड, दुकानातून 67 लाख जप्त!

आचारसंहिता लागू होताच मुंबई पोलिसांना सापडलं घभाड, दुकानातून 67 लाख जप्त!

गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची हमी, प्रत्येक वर्षी त्यांच्या खात्यात 72 हजार रुपये जमा गेले जातील. या योजनेसाठी गरिबीवर वार, ७२ हजार अशी घोषणा दिली आहे.

गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची हमी, प्रत्येक वर्षी त्यांच्या खात्यात 72 हजार रुपये जमा गेले जातील. या योजनेसाठी गरिबीवर वार, ७२ हजार अशी घोषणा दिली आहे.

निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली. याच पार्श्वभूमीवर सगळ्यात जिल्ह्यांत कडक कारवाई करण्यात येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूकांची शनिवारी घोषणा केली. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली. याच पार्श्वभूमीवर सगळ्यात जिल्ह्यांत कडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही आचारसंहिता लागू होताच मोठी कारवाई केली आहे. तब्बल 67 लाख रुपये मुंबईच्या एलटी मार्ग परिसरातून जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका सामान्य दुकानातून एवढी मोठी रक्कम पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पैसे नक्की कोणाचे आहेत? एवढी रक्कम दुकानात कशासाठी ठेवण्यात आली? याचा आता पोलीस तपास करत आहेत. खरंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस खातं हायअलर्टवर असतं. अशात दुकानात मोठी रक्कम ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दुकानावर धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी तब्बल 67 लाख रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेली रक्कम ही आयकर विभागाकडे पाठवण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर आयकर विभागाकडूनही नेमकी रक्कम कुठून पाठवण्यात आली आहे. याचा शोध सुरू आहे. या प्रकणात पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्याची कठोर चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. इतर बातम्या - आता भाजपचा हा 'रम्या' पाजणार विरोधकांना डोस, पवारांवर म्हणाला...! शनिवारी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे लगेचच आचारसंहित लागू झाली. पण पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांची प्रणिती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी मतदारांना मेकअप बॉक्स गिफ्ट म्हणून वाटले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार नरसय्या यांच्याकडून करण्यात आली. आडम मास्तरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली. त्यावर आता प्रणिती शिंदे यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इतर बातम्या - निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का, काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यासोबतच आयोगानं 64 जागांवर पोटनिवडणुकांसाठीही सूचना जारी केल्या आहेत. या दरम्यान, निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी प्लास्टिक वापरासंदर्भात विशेष निर्देश जारी केले. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा, असं आवाहन सुनील अरोरा यांनी केलं. इतर बातम्या - दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं.. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार 1. पेंशनचं काम 2. आधारकार्ड बनवणं 3. जाती प्रमाण पत्र बनवणं 4. वीज आणि पाण्यासंबंधी काम 5. साफसफाई संबंधी काम 6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं 7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही 9. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत 10. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत. SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ!
  First published: