विदेशी महिलेच्या पोटात 5 कोटींचं कोकेन, असा झाला धक्कादायक खुलासा

विदेशी महिलेच्या पोटात 5 कोटींचं कोकेन, असा झाला धक्कादायक खुलासा

कोर्टाने परवानगी दिल्यावर त्या महिलेचा एक्स रे काढण्यात आल्या. त्यात जे दिसलं त्याने सर्वच अधिकारी चक्रावून गेले.

  • Share this:

मुंबई 14 ऑगस्ट : ड्रग्सची तस्करी करणारे तस्कर अंमली पदार्थ लपविण्यासाठी ज्या क्लुप्त्या करतात त्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका विदेशी महिलेला अटक केलीय. मुंबई DRI ने ही करावाई करत तब्बल 5 कोटींच कोकेन जप्त केलंय. मुंबई आणि देशातल्या इतर महानगरांमध्ये हे कोकेन पोहोचवलं जाणार होतं. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचं एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

अबब...रक्षाबंधानासाठीच्या या 'गोल्डन' मिठाईचा भाव ऐकला तर तुम्ही चाटच पडाल!

अंमली पदार्थ विरोधी पथकाला मुंबईत ड्रग्जचा मोठा साठ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यादृष्टीने पथकाने मुंबई विमानतळावर सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका विदेशी महिलेला ताब्यात घेतलं. ही महिला ब्राझीलची राजधानी साओ पालोमधून आली होती.

पोलिसांनी जेव्हा झडती घेतली तेव्हा त्यांना तिच्याजवळ काहीही आढळून आलं नाही. मात्र पोलिसांना तिच्याजवळ ड्रग्ज असल्याची पक्की खात्री होती. त्यामुळे त्यांनी तिला ताब्यात घेऊन एक्स रे साठी कोर्टाची परवानगी मागितली. कोर्टाने परवानगी दिल्यावर त्या महिलेचा एक्स रे काढण्यात आल्या. त्यात जे दिसलं त्याने सर्वच अधिकारी चक्रावून गेले.

टीकेनंतरही मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा पुन्हा सुरू होणार! या आहेत तारखा

त्यात महिलेच्या पोटात तब्बल 80 कॅप्सुल्स असल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी औषधांच्या मदतीने त्या कॅप्सुल्स बाहेर काढल्या. त्याची जेव्हा तपासणी करम्यात आली तेव्हा त्या कॅप्सुल्स या कोकेनच्या असल्याचं आढळून आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत तब्बल पाच कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

तपास अधिकाऱ्यांना संशय येणार नाही अशा ठिकाणी कॅप्सुल्सच्या मदतीने ड्रग्ज दडवून ठेवण्यात येतात. संशय येवू नये यासाठी महिलांचा वापर करण्यात येतो अशी माहितीही पोलिसांनी दिलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2019, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading