मुंबई, 18 मार्च : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जमावबंदीचे आदेश (section 144 in Mumbai) लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) काढलेल्या या आदेशानुसार, बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. यामुळे पाच किंवा त्याहून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.
बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा आदेश काढला आहे. यानुसार आता पाच किंवा त्याहून अधिक नागरिकांना एकत्र जमा होता येणार नाहीये. तसेच मोर्चाही काढता येणार नाहीये. मिरवणूक, वरात, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे.
वाचा : रंगाचा बेरंग; धुळवडीच्या फुग्याने घेतला बळी,फुगा मारल्याने अपघातात एकाचा मृत्यूनेमका काय आहे पोलिसांचा आदेश?
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. यानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध केल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ८ एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केले आहेत.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 8 एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केले आहेत.
मुंबई पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता विविध चर्चा होऊ लागल्या आहेत. नेमका पोलिसांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडूनही आता यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. गेल्या आठवड्याभरात भाजपकडून दोनवेळा मोर्चे काढण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी भाजपने एक मोर्चा काढला होता आणि त्यानंतर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी एक मोर्चा काढला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून हे आदेश काढण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.