मुंबईत इमारतीच्या गच्चीवर रंगलं थरार नाट्य, जिगरबाज पोलिसांनी वाचवला तरुणीचा जीव; हा VIDEO एकदा पाहाच

मुंबईत इमारतीच्या गच्चीवर रंगलं थरार नाट्य, जिगरबाज पोलिसांनी वाचवला तरुणीचा जीव; हा VIDEO एकदा पाहाच

काही क्षण जरी उशीर झाला असता तर तिने खाली उडी घेतली असती.

  • Share this:

मुंबई 02 ऑक्टोबर: मुंबईतल्या अंधेरीत शुक्रवारी थरार नाट्य घडलं. कोरोनाच्या लढाईत गुंतलेल्या पोलिसांना दुसरीही लढाई लढावी लागत आहे. इमारतीच्या 6व्या मजल्यावर जात आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एका तरुणीचा जीव मुंबई पोलिसांनी  आपला जीव धोक्यात घालत वाचवला. त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सहा मजले चढून जात पोलिसांनी मोठ्या चतुरपणे त्या तरुणीला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांना शुक्रवारी दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी पश्चिम नियंत्रण कक्षातून एक कॉल प्राप्त झाला. त्यातल्या माहितीनुसार एक मुलगी तिरुपती बालाजी बिल्डिंग या सहा मजली इमारतीच्या गच्चीवरच्या टाकीवर चढली असून ती जीव देण्याचा प्रयत्न करीत आहे अशी माहिती देण्यात आली.

ही माहिती मिळताच पोलीस कामाला लागले. अंधेरी मोबाईल पथकातले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, बीट मार्शल शिवाजी पावडे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांचे इतर सहकारीही तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांचं मिशन सुरू झालं.

सर्व कर्मचारी इमारतीच्या गच्चीवर चढले आणि मुलीला विश्वासात घेऊन बोलण्यात गुंतवून ठेवलं. प्रवीण जाधव यांनी मुलीस बोलण्यात गुंतवून संधी साधून पाण्याच्या टाकीवर चढले आणि मुलीजवळ गेले. आणि काही क्षणातच तिला आपल्या ताब्यात घेतलं. काही क्षण जरी उशीर झाला असता तर तिने खाली उडी घेतली असती. त्याच वेळी पोलीस निरिक्षक भिंगर्दिवे, थिटे  आणि सोनिया साळवी यांनी जीवाची बाजी लावून मुलीला ताब्यात घेवून सुरक्षित पोलीस ठाण्यात आणले.

ही तरुणी शिक्षण घेत आहे. मुलीला ताब्यात घेवून पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने घरगुती कारणास्तव असे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. आता त्या तरुणीला पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडे सोपवलं असून तिचं समुपदेशनही करण्यात येणार असल्याची माहिती अंधेरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2020, 9:41 PM IST

ताज्या बातम्या