मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात दररोज हजारो पर्यटक येत असतात. गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने एलिफंटा आणि मांडवाला प्रवास करता येतो. आज रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक पर्यटक एलिफंटाला जाण्यासाठी बोटीने निघाले होते. (हिना खानच्या कुटुंबाला कोरोना, चेहऱ्याची अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का) एका बोटीतून प्रवास करत असताना अचानक एक महिला समुद्रात बुडाली. लाटेचा जोरदार धडकेमुळे बोटीला मोठा धक्का बसला त्यामुळे ही महिला समुद्रात पडली होती. याची माहिती मिळताच मुंबई सागरी पोलिसांचे सुरक्षा पथक सतर्क झाले आणि त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. (भाजपच्याच पाठिंब्यावर निवडून आलो', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट) या महिलेकडे दोरखंड फेकून तिला बोटीवर सुरक्षितपणे आणण्यात आले. सुदैवाने या महिलेनं लाईफ जॅकेट घातलेलं होतं. त्यामुळे ही महिला पाण्यात बऱ्याच वेळ पाण्यातच तरंगत होती, पण वेळी जिगरबाज पोलिसांनी धाव घेऊन या महिलेचा जीव वाचवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.#WATCH | A team of Coastal Police & Colaba Police rescued a woman tourist who was drowning in the sea near Gateway of India, Mumbai today. The woman lost control and fell into the water after a strong ocean current hit her boat: Mumbai Police pic.twitter.com/UQFOfMQ8oK
— ANI (@ANI) January 9, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.