VIDEO : मुंबईच्या या पोलिसाला सलाम! HEART ATTACK आलेल्या प्रवाशाचा खांद्यावर नेवून वाचवला जीव

VIDEO : मुंबईच्या या पोलिसाला सलाम! HEART ATTACK आलेल्या प्रवाशाचा खांद्यावर नेवून वाचवला जीव

प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलीस कर्मचाऱ्याचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

  • Share this:

मनोज कुलकर्णी, मुंबई, 7 फेब्रुवारी : घाटकोपर रेल्वे स्थानकात आज सकाळी एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. त्या प्रवाश्यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलीस देवदूत म्हणून धावले. त्यातील धनंजय गवळी हा पोलीस कर्मचारी हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाला रुग्णवाहिकेपर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन गेला. तसंच रुग्णालयात दाखल करून त्या प्रवाशाचा जीव वाचवला.

अलिकडच्या काळात जनतेच्या मनात पोलिसांविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. असं असताना काही पोलीस मात्र आपल्या खात्याचं नाव उंचावत जनतेमध्ये विश्वास निर्माण करत आहेत. कुर्ला रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्या अंतर्गत पोलीस हवालदार रवींद्र सोनवणे,शिपाई धनंजय गवळी आणि महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा अभंग, रुपाली निमसे हे आज सकाळी 9 वाजता घाटकोपर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर होते.

बदलापूर येथून जलद लोकलने पकडून आलेले प्रवासी प्रकाश बाबसहरब गच्छे हे घाटकोपरमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उतरले. तेव्हा अचानक त्यांच्या छातीत अचानक कळा सुरू झाल्या आणि त्यांना हृदय विकाराचा झटका आला. प्रवाशांनी आरडाओरडा केला आणि तिथं तैनात असलेल्या हमालांना बोलावण्याचा प्रयत्न केला.

मुंबईवर राहणार आता 'बिग बॉस'ची नजर, राज्य सरकारची मोठी घोषणा

स्टेशनवरील हमाल वेळेत न आल्याने पोलीस शिपाई धनंजय गवळी यांनी प्रकाश गच्छे यांना आपल्या खांद्यावर उचलले आणि घाटकोपर स्टेशन बाहेर असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेलं. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

सध्या प्रकाश गच्छे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलीस कर्मचाऱ्याचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 08:12 PM IST

ताज्या बातम्या