मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सोशल मीडियामुळे 75 वर्षांची महिला अखेर 15 दिवसांनी कुटुंबीयांना भेटली; मुंबई पोलिसांचं होतंय कौतुक!

सोशल मीडियामुळे 75 वर्षांची महिला अखेर 15 दिवसांनी कुटुंबीयांना भेटली; मुंबई पोलिसांचं होतंय कौतुक!

या संकटकाळात काही ठिकाणी माणुसकीचा झरा पुरता ओसरलेला दिसतोय, तिथेच अशी काही सुचिन्हंही दिसत आहेत. सोशल मीडियाचा खरा सकारात्मक उपयोग ही स्टोरी वाचल्यावर समजेल.

मुंबई, 28 एप्रिल: सोशल मीडियाबद्दल, त्याच्या वापराबद्दल नेहमीच उलट-सुटल चर्चा होत असते. सोशल मीडिया अनेक दुरावलेल्या व्यक्तींना जोडतो तसा प्रोपगंडा, प्रचार, वाईट गोष्टी, द्वेष पसरवतो. सोशल मीडियामुळे लोक आत्मकेंद्री झाल्याचं बोललं जातं. पण मुंबई पोलिसांनी मात्र सोशल मीडियाचा खरा वापर माणसं जोडण्यासाठीच कसा आहे हे सिद्ध केलं. या संकटात हरवत चाललेल्या माणुसकीचं दर्शन होत असतानाच मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. त्याबद्दल मुंबई पोलिसांचं कौतुक होत आहे.

एक 75 वर्षांची महिला मुंबईच्या जुहू उपनगरातल्या रस्त्यांवर निरुद्देश भटकताना दिसली. तिची चौकशी करता तिला आपल्या नावाखेरीज काहीच आठवत नव्हतं. अनेक जण त्या स्त्रीकडे पाहून दुर्लक्ष करून पुढे जात होते. तिची अवस्था पाहता ती कुटुंबीयांपासून दुरावलेली वाटत होती. तिची मनोवस्था पाहता तिला मदतीची गरज होती.  मुंबई पोलिसांपर्यंत ही खबर पोहोचली. जुहू पोलिसांनी या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि सोशल मीडियाच्या मदतीने तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला.

सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप

पोलिसांनी या महिलेचा फोटो सोशल मीडियावर टाकला. तो या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचला. या स्त्रीच्या नातेवाईकांपर्यंतही पोहोचला आणि कुटुंबाचं मीलन झालं. या महिलेच्या नातेवाईकांना तब्बल 15 दिवसांनी हरवलेली बहीण मिळाली. पंधरवड्यानंतर कुटुंब एकवटलं आणि तेही पोलिसांमुळे.

पोलीस तपास करण्याकरिता समाज माध्यमांचा वापर काही वेळा करतात. समाज माध्यमांवर छायाचित्र आणि संदेश प्रसारित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना शोधण्यात यश मिळाले आहे, असं मुंबई पोलिसांनीच कळवलं आहे.

या कर्तव्यतत्परता आणि माणुसकीबद्दल जुहू पोलिसांचं कौतुक होत आहे.

First published:

Tags: Instagram, Mumbai, Mumbai police